पुणे। डेक्कन जिमखाना व महाटेनिस यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए-डेक्कन जिमखाना महाटेनिस 12 वर्षांखालील राष्ट्रीय मानांकन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात स्मित उंडरे याने तर, मुलींच्या गटात रितिका दावलकर यांनी एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात अंतिम फेरीच्या लढतीत कोल्हापूरच्या तिस-या मानांकीत रितिका दावलकरने चौथ्या मानांकीत सृष्टी सूर्यवंशीचा 2-6, 6-1, 6-3 असा संघर्षपूर्ण पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले. दुहेरीत अंतिम फेरीत रितिका दावलकरने जान्हवी चौगुलेच्या साथीत काव्या तुपे व प्रांजली पांडुरेचा 6-3,6-3 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. रितिका ही न्यू इंग्लिश मिडीयम शाळेत सहावी इयत्तेत शिकत असून कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनमध्ये प्रशिक्षक प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
मुलांच्या गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित पुण्याच्या स्मित उंडरे याने नमिश हूडचा 6-4, 2-6, 6-1असा तीन सेटमध्ये पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. दुहेरीत अंतिम फेरीत स्मित उंडरे व वरद उंडरे या जोडीने आरव पटेल व आर्यन किर्तने यांचा 7-6(4), 6-3 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.
स्पर्धेतील विजेत्यांना करंडक, प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी डेव्हिस कूपर संदीप किर्तने आणि नितीन किर्तने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक प्रसनजीत पॉल, स्पर्धा निरीक्षक सेजल केनिया आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ(अंतिम) फेरी:
12 वर्षाखालील मुले:
स्मित उंडरे[1] वि.वि.नमिश हूड 6-4, 2-6, 6-1;
मुली:
रितिका दावलकर [3] वि.वि.सृष्टी सूर्यवंशी[4]2-6, 6-1, 6-3;
दुहेरी गट: अंतिम फेरी:
मुले: स्मित उंडरे/वरद उंडरे वि.वि.आरव पटेल/आर्यन किर्तने 7-6(4), 6-3;
मुली: रितिका दावलकर/जान्हवी चौगुले वि.वि.काव्या तुपे/प्रांजली पांडुरे 6-3,6-3.
महत्त्वाच्या बातम्या –
एमआरएफ मोग्रिप राष्ट्रीय सुपरक्रॉस स्पर्धा शनिवारी पुण्यात रंगणार
एमएसएलटीए सुहाना स्मार्ट १० वर्षाखालील टेनिस सर्किट स्पर्धेस प्रारंभ
राज्य व्हॉलीबॉल संघाच्या प्रशिक्षण शिबिरास शानदार प्रारंभ