राष्ट्रीय युवा (२१ वर्षाखालील) व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र मुलांच्या प्रशिक्षण शिबिरास पुण्यातील प्रियदर्शनी विद्यामंदिर (धनकवडी) येथे शानदार प्रारंभ झाला. हे शिबिर नऊ मे पर्यंत चालणार आहे.
अमोल बुचडे स्पोर्ट्स फाऊंडेशन व ऐश्वर्या स्पोर्ट्स अकादमी यांच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, अमरावती, औरंगाबाद, लातूर इत्यादी विभागातील सर्वोत्कृष्ट अठरा खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या शिबिरास राष्ट्रीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक प्रा.डॉ. संतोष पवार व प्रा.रोहित मालगावकर हे मार्गदर्शन करीत आहेत. हे शिबिर सकाळी अडीच तास व सायंकाळी अडीच तास अशा दोन सत्रात सुरू असून त्यामध्ये शारीरिक तंदुरुस्ती व व्हॉलीबॉलच्या वेगवेगळ्या पूरक तंत्रांविषयी मार्गदर्शन केले जात आहे. सायंकाळच्या सत्रात प्रामुख्याने अव्वल दर्जाच्या स्पर्धात्मक शैलीविषयी मार्गदर्शन केले जात आहे.
या शिबिरातील कामगिरीच्या आधारे आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या १२ खेळाडूंची निवड केली जाणार आहे. युवा विभागाची २४ वी राष्ट्रीय स्पर्धा इस्लामपूर (सांगली) येथे १० ते १५ मे या कालावधीत आयोजित केली जाणार आहे. प्रशिक्षण शिबिरासाठी महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष प्रतीक जयंत पाटील, सचिव श्री विरल शाह, मा.आप्पासाहेब रेणुसे, पै. अमोल बुचडे, युवराज रेणुसे,प्रा. डॉ. स्वप्नील विधाते, प्रियदर्शनी विद्यामंदिर (धनकवडी) प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ राजश्री दिघे व सौ.कुमुदिनी मांडवकर, प्रा.संदीप भोसले, पै. मनोज तोडकर इत्यादींचे सहकार्य लाभले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
४४व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडसाठी भारताचा सर्वात मोठा संघ जाहीर
थायलंडमध्ये दुसऱ्या क्रमांकासह संजयचे यशस्वी पुनरागमन
आमदार चषक राज्य ज्युनियर ज्यूदो स्पर्धा: क्रीडा प्रबोधिनी संघ उपविजेता








