मुंबई। महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या तर्फे आयोजित 16व्या एमएसएलटीए रमेश देसाई मेमोरियल 12 वर्षाखालील सब-ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या दक्ष पाटील, शौनक सुवर्णा, दर्श खेडेकर, तेलंगणाच्या हृतिक कटकम, मध्यप्रदेशच्या विवान बिदासरिया यांनी, तर मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या इशा देशपांडे, रितिका डावलकर या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
जी.ए.रानडे टेनिस कॉम्प्लेक्स येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत मुलांच्या गटात क्वालिफायर तेलंगणाच्या हृतिक कटकमने हरियाणाच्या सातव्या मानांकित दिशांदर लांबाचा 6-1, 6-0 असा एकतर्फी पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. महाराष्ट्राच्या बिगरमानांकीत दक्ष पाटील याने दिल्लीच्या दहाव्या मानांकित तक्षम सैनीचा 6-2, 6-1 असा सहज पराभव करून आजचा दिवस गाजवला. महाराष्ट्राच्या शौनक सुवर्णा याने उत्तरप्रदेशच्या अकराव्या मानांकित आरव ढेकियलचा 6-3, 6-4 असा तर, महाराष्ट्राच्या पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या दर्श खेडेकरने आपलाच राज्य सहकारी चौदाव्या मानांकित जय गायकवाडचा 6-0, 6-4 असा पराभव करून आगेकूच केली. मध्यप्रदेशच्या विवान बिदासरिया याने राजस्थानच्या तेराव्या मानांकित दर्श पाबुवालचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या इरा देशपांडे हिने तामिळनाडूच्या पंधराव्या मानांकित वसुंधरा बालाजीचे आव्हान 6-1, 6-3 असे मोडीत काढले. क्वालिफायर महाराष्ट्राच्या रितिका डावलकरने कर्नाटकाच्या तेराव्या मानांकित सनसेश वर्धमानीचा 6-1, 6-1 असा पराभव करून उप-उपांत्यपूर्व फेरी गाठली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल : दुसरी फेरी: मुले:
तविश पाहवा(हरियाणा)[1] वि.वि.ईशान बडागी(कर्नाटक) 6-0, 6-1;
पुरहन यादव(हरियाणा)[16]वि.वि.अक्षत दक्षिणदास(महाराष्ट्र) 6-0, 6-3;
दक्ष पाटील(महाराष्ट्र)वि.वि.तक्षम सैनी(दिल्ली)[10] 6-2, 6-1;
वरुण विजयकुमार(तामिळनाडू)वि.वि.धनुष बिल्लापुरा 6-3, 6-4;
शिव शर्मा(हरियाणा)[4] वि.वि.देव केसरिया(गुजरात) 6-1, 6-3;
विवान बिदासरिया(मध्यप्रदेश) वि.वि.दर्श पाबुवाल(राजस्थान)[13] 6-3, 6-2;
हृतिक कटकम(तेलंगणा)वि.वि.दिशांदर लांबा(हरियाणा)[7] 6-1, 6-0;
शौनक सुवर्णा(महाराष्ट्र)वि.वि.आरव ढेकियल(उत्तरप्रदेश)[11] 6-3, 6-4;
प्रज्ञेश शेळके(महाराष्ट्र)[15]वि.वि.संकल्प सहानी(पश्चिम बंगाल) 6-1, 6-1;
दर्श खेडेकर(महाराष्ट्र) वि.वि.जय गायकवाड(महाराष्ट्र)[14] 6-0, 6-4;
मुली:
आनंदिता उपाध्याय(हरियाणा)[1] वि.वि.मानवी गुप्ता(हरियाणा) 6-2, 6-0;
रितिका डावलकर(महाराष्ट्र)वि.वि.सनसेश वर्धमानी(कर्नाटक)[13] 6-1, 6-1;
रीत अरोरा(हरियाणा)[11]वि.वि.सौम्या तमंग(महाराष्ट्र) 6-2, 6-3;
अविका(हरियाणा)[8] वि.वि.अक्षीता अनंतरामन(कर्नाटक) 6-2, 1-6, 6-4;
हविशा चौधरी(राजस्थान)[4]वि.वि.तनिष्का चोप्रा(राजस्थान) 6-2, 6-1;
इरा देशपांडे(महाराष्ट्र)वि.वि.वसुंधरा बालाजी(तामिळनाडू)[15] 6-1, 6-3.
महत्त्वाच्या बातम्या –
‘मी प्रत्येक सामना खेळू इच्छितो, पण आमच्याकडे पंत…’, इशानचे रिषभबरोबरील स्पर्धेबाबत मोठे भाष्य