भारतीय क्रिकेटमध्ये सध्या गुणवंत खेळाडूंची कसलीही कमतरता नाही. संघाकडे चांगल्या खेळाडूंचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. एका जागेसाठी अनेक खेळाडूंचे पर्याय निवडकर्त्यांकडे आहेत. याच पार्श्वभूमीवर यष्टीरक्षकाच्या भूमिकेत संघ रिषभ पंत याला पहिली पसंती मिळत असते. त्याव्यतिरिक्त संघाकडे संजू सॅमसन, ईशान किशन आणि केएल राहुल हे यष्टीरक्षक फलंदाजही उपस्थित असतात. अशातच संघात स्थान मिळवण्यासाठी पंतसोबत होणाऱ्या स्पर्धेविषयी ईशान किशनने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
ईशान किशनच्या मते पंत आणि त्याच्यात थोडी स्पर्धा नक्कीच आहे. जेव्हा पंत संघातून बाहेर असतो, तेव्हा त्या संधीचा फायदा घेतला पाहिजे, असेही ईशान म्हणाला आहे. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना ईशान म्हणाला की, “नक्कीच एका यष्टीरक्षक फलंदाजाच्या रूपात मी प्रत्येक सामना खेळू इच्छितो. पण आमच्याकडे रिषभ आहे, ज्याने संघासाठी चांगले प्रदर्शन केले आहे. त्यामुळे मला ज्या संधी मिळतील, त्याचा फायदा घेतला पाहिजे. स्पर्धा ही नेहमीच आरोग्यदायी गोष्ट असते.”
ईशान आणि पंत चांगले मित्र आहेत. ईशान म्हणाला की, त्याने कधी विचार केला नव्हता की, त्याला संघात पंतची जागा घ्यावी लागेल. ईशान पुढे बोलता म्हणाला, “हो, तो (रिषभ पंत) चांगला मित्र आहे. जेव्हा आम्ही जवळ असतो, तेव्हा एकमेकांसोबत खूप फिरताना दिसतो. जेव्हा कधी आम्हाला वेळ मिळतो, आम्ही फक्त फिल्म पाहतो. आम्ही क्रिकेटविषयी, एकमेकांच्या खेळाविषयी खूप काही बोलतो.”
“मी त्याच्याशी माझ्या मनातले बोलतो आणि तो देखील असेच करतो. माझ्या डोक्यात एकदाही ही गोष्ट आली नाही की, मला त्याची जागा पाहिजे आणि तुम्हाला विश्वास देऊ शकतो की, त्याच्यासोबतही असेच झाले आहे. सर्वात महत्वाचे गोष्ट ही आहे की, जेव्हा आम्ही आमच्या क्रिकेटच्या दिनक्रमात असतो, तेव्हा आम्हाला असे वाटत नाही की, आम्ही एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहोत.”
“जेव्हा तुमची एका प्रतिभाशाली खेळाडूसोबत चांगली प्रतिस्पर्धा असेत, तेव्हा खूप मजा येते. तुम्ही त्या महत्वाच्या गोष्टींना आपोआप अनुभवू लागता. चांगले क्रिकेट खेळता आणि बाकिचे सर्वकाही आपोआप ठीक होते. मला यष्टीरक्षण आवडते, त्यामुळे जेव्हा कधी संधी मिळते, मी यासाठी सर्वश्रेष्ठ देण्याचा प्रयत्न करेल.” असे ईशान पुढे बोलताना म्हणाला.
महत्वाच्या बातम्या –
‘दीर्घ श्वास घे आणि त्या पत्रकाराचे नाव सांग’, सेहवागचा वृद्धिमान साहाला सल्ला
आनंदही आनंद गडे! ३ महिन्यांनंतर अष्टपैलू जडेजाचे भारतीय संघात पुनरागमन, टी२० मालिकेसाठी आहे उत्साहित
‘बुमराहदेखील आहे, त्याला विसरू नका’, गावसकरांची भारतीय वेगवान आक्रमणाबद्दल मोठी प्रतिक्रिया