---Advertisement---

किंग्स इलेव्हन पंजाबसाठी आनंदाची बातमी; हा गोलंदाज गाजवतोय सीपीएल

On: मंगळवार, सप्टेंबर 1, 2020 4:28 PM
---Advertisement---

मुंबई । कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल) 2020 मध्ये आतापर्यंत एकूण 20 सामने खेळले गेले आहेत. आणखी दहा सामन्यांनंतर बाद फेरीस (नॉकआउट) प्रारंभ होईल. गोलंदाजांच्या कामगिरीबद्दल विचार केला तर अफगाणिस्तानचा ऑफस्पिनर मुजीब उर रहमान सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे.

19 वर्षीय मुजीब उर रहमान प्रथमच सीपीएलमध्ये खेळत आहे. जमैका तलवाह संघाकडून खेळताना 6 सामन्यांत 19 बळी घेऊन तो अव्वल स्थानावर आहे. स्कॉट कुगेलेन (सेंट लुसिया जूक्स) आणि इम्रान ताहिर (गयाना ऍमॅझॉन वॉरियर्स) 7 सामन्यांत प्रत्येकी 11 विकेटसह दुसर्‍या स्थानावर आहेत.

मुजीब उर रहमानने आतापर्यंत शानदार गोलंदाजी केली. त्याने आतापर्यंत 6 सामन्यात 24 षटके टाकली आहेत. त्याने 7.15 च्या सरासरीने 13 विकेट आहेत. दुसरीकडे अफगाणिस्तानचा स्टार लेगस्पिनर राशिद खान केवळ 7 सामने 9 विकेट घेण्यास यशस्वी झाला. तो बार्बाडोस ट्रायडंट्स (बीटी) संघाकडून खेळत आहे. सहा संघांच्या स्पर्धेत गुणतालिकेमध्ये त्याचा संघ सध्या पाचव्या क्रमांकावर आहे.

मुजीबच्या कामगिरीवर नजर टाकल्यास जवळपास प्रत्येक सामन्यात त्याने वर्चस्व राखले. त्याच्या कामगिरीमुळे जमैका तलवाहचा संघ सध्या अव्वल -4 मध्ये आहे.

आयपीएलमध्ये मुजीब उर रहमान किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळतो. त्याला पंजाब संघाने 2018 मध्ये 4 कोटींमध्ये खरेदी केले होते. त्याने आतापर्यंत 16 आयपीएल सामन्यांत 17 बळी घेतले आहेत.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---