आयपीएल २०२२चा अकरावा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात खेळला गेला. रविवारी (०३ एप्रिल) मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चेन्नईच्या चाहत्यांना संघाकडून जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. हंगामातील पहिले २ सामने गमावणाऱ्या चेन्नईला त्यांच्या नव्या दमाच्या मध्यमगती गोलंदाज मुकेश चौधरी याने संघाला जबरदस्त सुरुवात करून दिली. त्याने या सामन्यातील पहिल्याच षटकात पंजाबची मोठी विकेट घेतली.
या सामन्यात नाणेफेक जिंकून चेन्नईने (CSK vs PBKS) प्रथम गोलंदाजी निवडली होती. त्यामुळे पंजाबकडून कर्णधार मयंक अगरवाल (Mayank Agarwal) आणि शिखर धवन सलामीला फलंदाजीसाठी आले होते. तर चेन्नईकडून युवा मुकेश चौधरी (Mukesh Choudhary) पहिले षटक टाकत होता. चौधरीच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मयंकने खणखणीत चौकार ठोकत सामन्याची दमदार सुरुवात केली होती. त्यामुळे हा युवा गोलंदाज या सामन्यातहू सपाटून मार खाणार असा अंदाज आयपीएलप्रेमींनी वर्तवला. मात्र त्याने दुसऱ्याच चेंडूवर कमाल केली आणि सर्वांना भुवया उंचावण्यास भाग पाडले.
चौधरीने दुसरा चेंडू असा काही मारला की, मयंकने पुन्हा त्यावर कव्हर पाँईटला जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु तिथे क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेल्या रॉबिन उथप्पाने त्याचा चेंडू अचूक टिपला. परिणामी केवळ ४ धावा करून मयंकला पव्हेलियनला परतावे लागले. मात्र चौधरीसाठी मयंकची विकेट विक्रमी आणि अविस्मरणीय ठरली. ही त्याची आयपीएलमधील पहिलीच (Mukesh Choudhary IPL Maiden Wicket) विकेट होती.
First-over success for @ChennaiIPL! 👏 👏
Mukesh Choudhary strikes as @robbieuthappa takes the catch. 👍 👍#PBKS lose their captain Mayank Agarwal.
Follow the match ▶️ https://t.co/ZgMGLamhfU #TATAIPL | #CSKvPBKS pic.twitter.com/C6OwIFVOkM
— IndianPremierLeague (@IPL) April 3, 2022
मुकेश चौधरीचे जोरदार पुनरागमन
यापूर्वी लखनऊ सुपरजायंट्सविरुद्ध चौधरीने आयपीएल पदार्पण केले होते. परंतु या सामन्यात लखनऊच्या फलंदाजांनी त्याला चांगलाच चोप दिला. या सामन्यात त्याने ३.३ षटके फेकली. यादरम्यान त्याने ३९ धावा खर्च केल्या. मात्र त्याला एकही विकेट घेता आली नव्हती. तरीही चेन्नईच्या कर्णधाराने दुसऱ्या सामन्यात त्याच्यावर विश्वास दाखवत त्याला संधी दिली आणि तो पहिल्याच षटकात विकेट घेत कर्णधाराच्या विश्वासावर खरा उतरला.
पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यासाठी चेन्नई सुपर किंग्जची प्लेइंग इलेव्हन: ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा (कर्णधार), एमएस धोनी (यष्टीरक्षक), शिवम दुबे, ड्वेन ब्रावो, ख्रिस जॉर्डन, ड्वेन प्रिटोरियस, मुकेश चौधरी
महत्त्वाच्या बातम्या-
टॉम लॅथमने वाढदिवस बनवला आणखी खास, तब्बल २४ वर्षांपूर्वीचा सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम काढला मोडीत
थाला @३५०! धोनीचा टी२०त ‘भीमपराक्रम’, मैदानावर पाऊल ठेवताच शिरपेचात अजून एक मानाचा तुरा
चहलच्या दबावामुळे बटलरने मुंबईविरुद्ध ठोकले शतक, जाणून घ्या जोसने असे म्हणण्यामागचे कारण