भारतीय संघ सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. उभय संघात सध्या पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. मालिकेतील चौथा सामना शनिवारी (12 ऑगस्ट) खेळला जाणार आहे. तत्पूर्वी भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाब्रे यांनी वेगवान गोलंदाज मुकेश कुमार याच्याविषयी मोठी प्रतिक्रिया दिली.
मुकेश कुमार (Mukesh Kumar) याच्यासाठी 2023चा वेस्ट इंडीज दौरा खऱ्या अर्थाने खास ठरला. त्याने या एकाच दौऱ्यात भारतासाठी तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये पदार्पण केले. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमधील मुकेश कुमारचे प्रदर्शन पाहून गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे () यांच्याही अपेक्षा वाढल्याचे दिसते. याच पार्श्वभूमीवर त्यांनी मुकेश कुमारविषयी खास प्रतिक्रिया दिली आहे. म्हांब्रेंच्या मते मुकेश कुमार तिन्ही प्रकारांमध्ये चांगले प्रदर्शन करू शकतो. याच पद्धतीने त्याचा वर्कलोड देखील येत्या काळात मॅनेज केला जाईल.
उभच संघांमधील चौथा टी-20 सामना फ्लॉरिडामध्ये खेळला जाणार आहे. त्याआधी माध्यमांसमोर पारस म्हांब्रे म्हणाले की, “त्याचे (मुकेश कुमार) प्रगती पाहून आनंदी आहे. त्याची विचार करण्याची पद्धत आणि खेळाकडे पाहण्याचा दृष्टीकोण अप्रतिम आहे. तो क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये खेळू शकतो, हे समजलेच आहे. यासाठी त्याच्या वर्कलोडचे व्यवस्थापन करणे आवश्यक असणार आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खूप क्रिकेट खेळले आहे, ज्याठिकाणी चांगले कौशल्य मुकेश कुमारने मिळवले आहे.”
दरम्यान, मुकेश कुमारने आपले कसोटी पदार्पण वेस्ट इंडीजविरुद्धचा सामन्यात केले जो, 20 ते 24 जुलै दरम्यान खेळला गेला. त्यानंतर उभय संघांतील वनडे मालिकेत देखील त्याचा वनडे पदार्पणाची संधी मिळाली. 27 जुलै रोजी मुकेशने वनडे क्रिकेटमधील आपला पहिला सामना खेळला. त्यानंतर उभय संघांतील टी-20 मालिकेत त्याने या प्रकारातील पहिला सामना 3 ऑगस्ट रोजी खेळला.
उभय संघातील टी-20 मालिकेचा विचार केला, तर यजमान वेस्ट इंडीज आघाडीवर आहे. मालिकेतील पहिले दोन सामने वेस्ट इंडीजने, तर तिसरा सामना भारताने जिंकला आहे. असात वेस्ट इंडीज सध्या 2-1 अशा आघाडीवर आहे. भारताला मालिका जिंकण्यासाठी चौथा आणि पाचवा सामना जिंकावा लागणार आहे. (Mukesh Kumar is capable of playing all three formats, says India bowling coach Paras Mhambre )
महत्वाच्या बातम्या –
अखेर इंस्टाग्राम कमाईबाबत विराटने सोडले मौन! म्हणाला, “मी कमावतो…”
पहिले रोहित आता विराट! आपल्या पदार्पणातच तिलकला दिग्गज खेळाडूंचे रेकॉर्ड मोडण्याची संधी