भारताच्या टी20 संघात मागील अनेक सामन्यांपासून बदल होताना दिसत आहे. जेव्हापासून भारताला टी20 विश्वचषक 2022च्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभूत व्हावे लागले तेव्हापासून निवडकर्त्यांनी युवा खेळाडूंना संधी देण्याचे ठरवले आहे. त्याचाच प्रत्यय श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी निवड करण्यात आलेल्या संघात दिसला आहे. या मालिकेसाठी जे 16 खेळाडू निवडण्यात आले त्यातील एका खेळाडूसाठी वर्षाच्या शेवटी आणखी एक सुखद बातमी मिळाली आहे.
श्रीलंकेविरुद्ध भारताच्या टी20 संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्या (Hardik Pandya) करणार आहे. त्यामध्ये प्रथम श्रेणीत विशेष कामगिरी करणाऱ्या मुकेश कुमार (Mukesh Kumar) याला सामील केले आहे. बिहारच्या या मध्यमगती वेगवान गोलंदाजाने प्रथम श्रेणीच्या 58 डावांमध्ये खेळताना 123 विकेट्स घेतल्या आहेत.
मुकेशने यावर्षीच्या सुरूवातीला इंडिया ए संघात जागा मिळवली. त्याला घरच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या न्यूझीलंड ए विरुद्धच्या सामन्यांसाठी संघात घेतले गेले. तसेच त्याला नंतर बांगलादेश ए संघाविरुद्धही संधी मिळाली. तेव्हा खेळल्या गेलेल्या दुसऱ्या अनाधिकृत कसोटी सामन्यात त्याने 40 धावा देताना 6 विकेट्स घेतल्या होत्या. यादरम्यान त्याला घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात निवडले गेले, मात्र त्याला एकही सामन्यात अंतिम अकरामध्ये जागा मिळाली नाही.
मुकेशने निराश न होता त्याची कामगिरी सुरूच ठेवली आणि त्याचा फायदा म्हणून त्याला आयपीएल 2023 खेळण्याची संधी मिळाली. त्याला नुकत्याच झालेल्या आयपीएल 2023च्या लिलावात दिल्ली कॅपिट्लसने मोठ्या रकमेत संघात घेतले. यामध्ये त्याला दिल्लीने 5 कोटी 50 लाख रुपयांमध्ये खरेदी केले. या लिलावात दिल्लीने एकूण 5 खेळाडूंना खरेदी केले, ज्यामध्ये मुकेश सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याचे वडील काशिनाथ सिंग कोलकातामध्ये रिक्षा चालक होते, त्यांचे निधन आले आहे.
मुकेशने देशांतर्गत क्रिकेटमध्ये 2015मध्ये पदार्पण केले. त्याने आतापर्यंत 23 टी20 सामन्यात 25 विकेट्स घेतल्या आहेत. भारत विरुद्ध श्रीलंका पहिला टी20 सामना 3 जानेवारीला मुंबईमध्ये खेळला जाणार आहे. Mukesh Kumar Selected in Team India against Sri Lanka T20 series
श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारताचा संघ-
हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन, राहुल त्रिपाठी, ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुडा, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी व मुकेश कुमार.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी संजूची टीम इंडियात एंट्री, मात्र वनडे….
एटीके मोहन बागानचे अनेक खेळाडू दुखापतग्रस्त, गोवाविरुद्धच्या महत्वाच्या सामन्यात कसे होणार?