पाकिस्तान सुपर लीग टी20 मध्ये खेळाडूंचे फलंदाजी आणि गोलंदाजीचे उत्कृष्ट प्रदर्शन पाहायला मिळाले. पाकिस्तान सुपर लीगचा अंतिम सामना मुलतान सुलतान आणि पेशावर जाल्मी या दोन संघांमध्ये झाला. या अंतिम सामन्यांमध्ये वेगळाच अंदाजाची फलंदाजी पाहायला मिळाली.
या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यास मुलतान सुलतान हा संघ मैदानावर उतरला. मुलतान सुलतान या संघाने चांगली सुरुवात करत 8.4 षटकांमध्ये 68 धावा केल्या. परंतु त्याच षटकांमध्ये पेशावर जाल्मी संघाचा गोलंदाज मुहम्मद इमरान उत्कृष्ट गोलंदाजी करत सलामीवीर फलंदाज शान मसूदचा बळी घेतला. यानंतर मुहम्मद इमरानने कर्णधार मोहम्मद रिजवानला 11 व्या षटकातील शेवटच्या चेंडूमध्ये कामरान अकमलच्या हातून झेलबाद करत 30 धावांवर परत पाठविले.
यानंतर जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली चौथ्या क्रमांकावर मैदानात उतरलेला फलंदाज रिली रोसोउने उत्कृष्ट फलंदाजी करत मैदानावर धुमाकूळ घातला. रिलीच्या शानदार फलंदाजीने चौकार आणि षटकाराचा मैदानात पाऊस पाडला. 14 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूमध्ये रीलीने वेगळा अंदाजात गुडघ्यावर बसून पॉईंटवरून एक खणखणीत षटकार मारला. अमाद बटने ऑफ स्टम्पवर टाकलेला चेंडू रिलीने फ्लिक करून जबरदस्त षटकार लगावला. अमाद हे दृश्य आश्चर्याने पाहातच राहिला होता.
याच्यानंतर रिली थांबला नाही. रिलीने 250 पेक्षा ही जास्त स्ट्राईक रेटने जबरदस्त फलंदाजी केली आणि पेशावर जाल्मीच्या गोलंदाजांची झोप उडवली. रिलीच्या या धडाकेबाज फलंदाजीची क्रिकेटच्या विश्वात सर्वत्र चर्चा होत आहे
OMG @Rileerr!
That was one of the shots of the tournament! ???????? #HBLPSL6 | #MatchDikhao | #MSvPZ pic.twitter.com/xXuZX3tom9
— PakistanSuperLeague (@thePSLt20) June 24, 2021
रिली दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू आहे. ज्याने 2016 पर्यंत दक्षिण आफ्रिकेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये त्याने 15 सामन्यांमध्ये 327 धावा केल्या आहेत. पण आयपीएल 2014-15 दरम्यान पाच सामन्यांमध्ये त्याला फक्त 53 धावा बनवता आल्या होत्या. परंतु, पीएसएल 6 मध्ये त्याने धडाकेदार फलंदाजी करत सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२१ नंतर दोनच दिवसांनी सुरू होणार टी२० विश्वचषकाचा थरार, ‘या’ दिवशी रंगणार अंतिम सामना
‘या’ भारतीय खेळाडूची क्रश आहे दिशा पटानी, इंग्लंड आहे सुट्टीसाठी आवडते ठिकाण
जोस बटलर दुखापतीमुळे ‘या’ महत्त्वाच्या मालिकेतून बाहेर, टी२० स्पेशालिस्टची संघात निवड






