सध्या विजय हजारे ट्राॅफी (Vijay Hazare Trophy) स्पर्धा खेळली जात आहे. दरम्यान (26 डिसेंबर) रोजी अहमदाबादमध्ये अरूणाचल प्रदेश विरूद्ध मुंबई (Arunachal Pradesh vs Mumbai) संघात विजय हजारे ट्रॉफीचा गट क सामना खेळला जात होता. या सामन्यात ‘शार्दुल ठाकूर’च्या (Shardul Thakur) नेतृत्वाखालील मुंबईने चमकदार कामगिरी केली. मुंबईने अरुणाचल प्रदेशचा अवघ्या 33 चेंडूंमध्ये पराभव केला.
टाॅस जिंकल्यानंतर मुंबईने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, जो योग्य ठरला. प्रथम फलंदाजीला आलेल्या अरूणाचल प्रदेशची सुरुवात खूपच खराब झाली. अरूणाचल प्रदेशच्या कोणत्याही खेळाडूला 17+ धावा देखील करता आल्या नाहीत. अरूणाचल प्रदेशसाठी ‘याब निया’ने (Yab Niya) 10 चेंडूत सर्वाधिक 17 धावा केल्या. याशिवाय ताची डोरियाने 13 धावा केल्या. दरम्यान अरूणाचल प्रदेशचा संपूर्ण संघ 32.2 षटकात 73 धावात सर्वबाद झाला आणि मुंबईला 74 धावांचे लक्ष्य दिले.
या सामन्यात विनायक भोईर (Vinayak Bhoir) वगळता मुंबईच्या सर्व गोलंदाजांनी विकेट्स घेतल्या. कर्णधार ‘शार्दुल ठाकूर’शिवाय (Shardul Thakur) हर्षा तन्ना (Harsha Tanna), हिमांशू सिंग (Himanshu Singh) आणि अथर्व अंकोलेकर (Atharva Ankolekar) यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. रॉयस्टन डायस (Royston Dias) आणि सूर्यांश शेडगे (Suryansh Shedge) यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबई संघासाठी हे लक्ष्य खूपच सोपे ठरले. मुंबईचा सलामीवीर अंगक्रीश रघुवंशी (Angkrish Raghuvanshi) याने 277.77च्या स्ट्राईक रेटने केवळ 18 चेंडूत नाबाद 50 धावा केल्या. त्यामुळे मुंबईने अवघ्या 5.3 षटकांत हे लक्ष्य गाठले. दरम्यान संघाने 1 विकेट गमावून 77 धावा केल्या. त्यानंतर अरूणाचल प्रदेशचा 9 विकेट्सने दारूण पराभव करण्यात मुंबईला यश आले.
महत्त्वाच्या बातम्या-
यशस्वीचे शतक हुकले, तरीही केला खास विक्रम, सचिन तेंडुलकरला टाकले मागे
यशस्वी जयस्वालच्या रनआऊटमध्ये चुकी कोणाची होती? माजी क्रिकेटपटूंच्या जोरदार वादाचा व्हिडिओ समोर
IND vs AUS; रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमध्ये सतत फ्लॉप होण्याची 3 मोठी कारणे