मुंबई शहर कबड्डी असो. आयोजित मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ पुरस्कृत कुमार गट निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत शिवशक्ती, विकास, विहंग, जय दत्तगुरु, यंग विजय, गोलफादेवी यांनी तिसरी फेरी गाठली.
नायगाव येथील मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाच्या पटांगणावर सुरू असलेल्या या स्पर्धेतील दुसऱ्या फेरीच्या सामन्यात शिवशक्तीने शिवनेरीला ४२-२१ असे सहज नमविले. विनायक, साहिल आवळे यांच्या चढाई पकडीच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर शिवशक्तीने मध्यांतराला २६-११अशी महत्वाची आघाडी घेतली होती.
शिवनेरीचाअनिरुद्ध कदम एकाकी लढला. दुसऱ्या सामन्यात विकास मंडळाने अमरचा ३६-२८ असा पाडाव केला. अजित पाटील, विराज सिंग यांच्या नेत्रदीपक खेळाच्या बळावर विकासाने विश्रांतीला २७-११ अशी महत्वपूर्ण आघाडी घेतली होती.
शेवटी हीच आघाडी त्यांच्या कामी आली. विश्रांतीनंतर अमरच्या प्रणय शिंगटे, ओमकार गोवळकर यांनी टॉप गिअर टाकत सामन्यात रंगत आणली. पण संघाला मात्र ते विजय मिळवून देण्यात कमी पडले.
विहंगने बालवीरला ३६-१४ असे धुऊन काढले. मध्यांतराला विहंगकडे १४-०८अशी आघाडी होती. उत्तरार्धात मात्र त्यांनी जोरदार खेळ करीत सामना एकतर्फी केला. सुमित व समरन हे पाटील बंधू या विजयाचे शिल्पकार ठरले.
बालवीरचा दीक्षांत डांगे बरा खेळला. जय दत्तगुरुने शिवशंकरचा ५३-१३असा धुव्वा उडविला. मध्यांतराला ३९-०७ अशी भक्कम आघाडी घेणाऱ्या दत्तगुरुने नंतर मात्र सावध खेळ केला. यश नार्वेकर, दीपेश चव्हाण दत्तगुरूंच्या या विजयात चमकले. शिवशंकरच्या सार्थक बालगुडेचा खेळ बरा होता.
यंग विजयने गणेशकृपाला ४०-२९ असे पराभूत केले. सौरभ पोटवरे, सर्वेश राऊत यंग विजयकडून, तर किरण उंडे, गौरव कांडरे गणेशकृपाकडून छान खेळले. शेवटच्या सामन्यात गोलफादेवीने सात आसरावर ६३-३२ असा विजय मिळविला.
पहिल्या डावात ४०-१७अशी भक्कम आघाडी घेत गोलफादेवीने आपला विजय निश्र्चित केला होता. दुसऱ्या डावात औपचारिक खेळ करीत त्यावर शिक्कामोर्तब केले. धनंजय सरोज, हर्षल भुवड गोलफादेवीच्या या विजयाचे शिल्पकार ठरले. सात आसराचा पुष्कराज सरदेसाई याने बऱ्यापैकी लढत दिली.
महत्त्वाच्या बातम्या-
-विराट कोहलीप्रमाणेच हे ३ प्रो-कबड्डी स्टार ५ हंगामात खेळले एकाच संघाकडून
–प्रो कबड्डी- जाणून घेऊयात लिलवासंदर्भातील सर्व नियमावली
–या दिग्गज माजी खेळाडूची पुणेरी पलटणच्या प्रशिक्षकपदी निवड
–महाराष्ट्राच्या या तीन खेळाडूंवर लागु शकते प्रो-कबड्डीत सर्वाधिक बोली
–संपुर्ण यादी- प्रो कबड्डी लिलावासाठी महाराष्ट्राचे हे ४२ खेळाडू आहेत उपलब्ध
–आयपीएलप्रमाणेच प्रो-कबड्डी लिलावातही वापरता येणार आरटीएम
–कबड्डी- ई भास्करन तमिल थलाइवाजचे मुख्य प्रशिक्षक
–प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामासाठी ९ संघानी २१ खेळाडूंना केले कायम