मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या जिल्हा निवड चाचणीचा आज पाचवा दिवस. आज कुमार गटाचे २२ सामने खेळवण्यात आले. कुमार गटाच्या दुसऱ्याफेरीत जय भारत क्रीडा मंडळाने अमरप्रेम क्रीडा मंडळावर ४६ गुणांनी एकतर्फी विजय मिळवला.
ओमकार मोरे व अनिकेत पाटील याचा विजयात मोलाचा वाटा होता. दुर्गामाता स्पोर्ट्स क्लब विरुद्ध साऊथ कॅनरा स्पो.क्लब याच्या झालेला सामना मध्यंतर पर्यत २५-०८ अशी भक्कम आघाडी साऊथ कॅनराकडे होती.
मध्यंतरानंतर दुर्गामाता संघाने उत्कृष्ट खेल करत सामना फिरवला, प्रथमेश पालांडे व शुभम इंगळेने चढाईत पटापट गुण मिळवत संघाला आघाडी मिळवून दिली. हा सामना दुर्गामाता स्पो. क्लबने ०५ गुणांनी जिंकला. साऊथ कॅनराच्या अमन व प्रेम सोनावनेचे प्रयत्न वर्थ ठरले.
तिसऱ्या फेरीच्या सामन्यात विजय बजरंग व्या. शाळा विरुद्ध साईराज क्रीडा मंडळ हा सामना अटीतटीचा झाला. मध्यंतरला २४-१७ अशी आघाडी साईराज संघाकडे होती. सामन्याच्या उत्तराधरात विजय बजरंगच्या गणेश तुपे व स्वप्नील शेडगेने चढाईत गुण मिळवत संघाला आघाडी मिळवून दिली, गणेश तुपेने एका चढाईत ४ गुणांची सुपररेड केली.
अमर भारत विरुद्ध विजय नवनाथ हा सामना विजय नवनाथने ३२-१९ असा जिंकला. श्री गणेश स्पोर्ट्स क्लबने नवजवानचा ३४-२७ असा पराभव करून पुढील फेरीत प्रवेश मिळवला.
तिरुवल्लूर मेमोरियल, गुडमॉर्निंग स्पो क्लब, दुर्गामाता स्पो, बंड्या मारुती, अमरहिंद, अंकुर स्पो, श्री गणेश स्पो, सिद्धी प्रभा संघांनी पुढील प्रवेश मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या-
-विराट कोहलीप्रमाणेच हे ३ प्रो-कबड्डी स्टार ५ हंगामात खेळले एकाच संघाकडून
–प्रो कबड्डी- जाणून घेऊयात लिलवासंदर्भातील सर्व नियमावली
–या दिग्गज माजी खेळाडूची पुणेरी पलटणच्या प्रशिक्षकपदी निवड
–महाराष्ट्राच्या या तीन खेळाडूंवर लागु शकते प्रो-कबड्डीत सर्वाधिक बोली
–संपुर्ण यादी- प्रो कबड्डी लिलावासाठी महाराष्ट्राचे हे ४२ खेळाडू आहेत उपलब्ध
–आयपीएलप्रमाणेच प्रो-कबड्डी लिलावातही वापरता येणार आरटीएम
–कबड्डी- ई भास्करन तमिल थलाइवाजचे मुख्य प्रशिक्षक
–प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामासाठी ९ संघानी २१ खेळाडूंना केले कायम