पुणे (11 मार्च 2024) – आजचा तिसरा सामना मुंबई शहर विरुद्ध रायगड यांच्यात झाला. दोन्ही संघाना टॉप 4 मध्ये स्थान मिळवण्यासाठी हा सामना जिंकणे अत्यंत महत्वाचा होता. मुंबई शहर 21 गुणांसह चौथ्या तर रायगड संघ 20 गुणांसह पाचव्या क्रमांकावर होता. आजचा जालना विरुद्ध रत्नागिरी हा दुसरा सामना रद्द झाला.
मुंबई शहर ने आक्रमक सुरुवात करत आपले इरादे स्पष्ट केले होते. जतिन विंदे व राज आचार्य यांच्या आक्रमक खेळीने रायगड संघाला ऑल आऊट करत 13-05 अशी आघाडी मिळवली. त्यानंतर ही चतुरस्त्र चढाया करत जतिन व राज ने संघाची आघाडी वाढवून दिली. मध्यंतरापुर्वी पुन्हा एकदा ऑल आऊट करत 24-11 अशी आघाडी मिळवली.
मध्यंतरा नंतर रायगड संघाने चांगली झुंज दिली. शेवटची 10 मिनिटं असताना 11-24 वरून 21-31 अशी पिछाडी कमी केली. रायगड च्या अनुराग सिंग ने जबरदस्त चढाया करत संघाची पिछाडी कमी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. शेवटची दोन मिनिट शिल्लक असताना 35-41 अशी पिछाडी कमी केली होती. पण अखेर अनुराग सिंग चे प्रयत्न अपुरे पडले. रायगड संघाला 38-42 असा पराभव स्वीकारावा लागला. मुंबई शहर ने ह्या विजयासह टॉप 4 मध्ये स्थान मिळवत प्रमोशन फेरीत प्रवेश मिळवला. तर रायगड संघ टॉप 4 च्या शर्यतीतून बाहेर पडला. मुंबई शहराच्या ह्या विजयात राज आचार्य व जतिन विंदे यांच्या खेळी महत्वपूर्ण भूमिका निभावली. (Mumbai City entered the promotion round with a win over Raigad in a crucial match)
बेस्ट रेडर- अनुराग सिंग, रायगड
बेस्ट डिफेंडर- राज मोरे, रायगड
कबड्डी का कमाल- राज आचार्य, मुंबई शहर
महत्वाच्या बातम्या –
Rohit Sharma । हिटमॅनच्या नेतृत्वावर उपस्थित केला प्रश्न, माजी दक्षिण आफ्रिकी कर्णधाराचे मोठे विधान
मराठमोळ्या क्रिकेटपटूच्या 17 वर्षांच्या कारकिर्दीला अखेर विराम, मैदानावर ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन सन्मान