---Advertisement---

आयएसएल: मुंबई सिटी एफसीचे आव्हान संपल्यात जमा, केरला ब्लास्टर्सचा दणदणीत विजय

On: गुरूवार, मार्च 3, 2022 1:48 AM
Mumbai-City-FC
---Advertisement---

गोवा: गतविजेत्या मुंबई सिटी एफसीला इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्याच्या आशांना बुधवारी (०२ मार्च) सुरूंग लागला. केरला ब्लास्टर्स एफसीने ३-१ असा विजय मिजय मिळवून ३३ गुणांसह उपांत्य फेरीतील स्वतःचे स्थान जवळपास पक्के केले. केरला ब्लास्टर्सकडून सलाह समद (१९ मि.) याने पहिला गोल केला आणि त्यानंतर अल्वारो व्हॅझकेजने दणदणीत खेळ केला. व्हॅझकेजने (४५+१ मि. (पेनल्टी) व ६० मि.) दोन गोल करून केरलाचा विजय पक्का केला. मुंबई सिटीकडून डिएगो मॉरिसिओ याला पेनल्टीवर (७१ मि.) एकमेव गोल करता आला.

मुंबई सिटीने अखेरच्या साखळी सामन्यात हैदराबाद एफसीचा पराभव केल्यास आणि त्याचवेळी केरलाला त्यांच्या अखेरच्या लढतीत एफसी गोवाने नमवल्यास ही शर्यत चुरशीची होऊ शकते, परंतु केरलाची बाजू तरीही गोल डिफरन्सवर वरचढ ठरते.

केरला ब्लास्टर्स एफसी आयएसएलमधील आव्हान जीवंत राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसले. मुंबई सिटी एफसी उपांत्य फेरीच्या शर्यतीत केरलापेक्षा आघाडीवर असले तरी त्यांना एकही पराभव पत्करणारा नाही. पण, केरलाच्या तुलनेत पहिल्या ३० मिनिटांच्या खेळात त्यांची कामगिरी सुमार दाखवली. १९व्या मिनिटाला केरला ब्लास्टर्सच्या प्रयत्नांना यश आले. मुंबई सिटीच्या कॅसिओ गॅब्रिएलकडून चेंडू हिसकावून घेताना सलाह समदने अप्रतिम कौशल्य दाखवले. त्याने मुंबई सिटीचा गोलरक्षक मोहम्मद नवाझला चकवून केरलाला १- ० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर केरलाचे आक्रमण सुरूच राहिले.

४१व्या मिनिटाला इगोर अँगुलोने बरोबरीचा गोल करण्याची सोपी संधी गमावली. ४४व्या मिनिटाला बिपिन सिंगने केरलाच्या बचावपटूंना चकवून गोलजाळीच्या दिशेने चेंडू भिरकावला, परंतु तो गोलपोस्टच्या बाजूने गेला. ४५+१ मिनिटाला मोर्ताडा फॉलने पेनल्टी बॉक्समध्ये अल्वारो व्हॅझकेजला पाडले आणि रेफरीने पेनल्टी दिली. त्यावर व्हॅझकेजने गोल करून पहिल्या हाफमध्ये केरलाला २-० अशी आघाडी मिळवून दिली.

पहिल्या हाफप्रमाणे मुंबई सिटीने मध्यंतराची सुरुवातही दणक्यात केली, परंतु त्यांना गोल काही मिळत नव्हता. त्यात ६०व्या मिनिटाला गोलरक्षक नवाजने चूक केली आणि केरला ब्लास्टर्सने त्या संधीचं सोनं केलं. मोर्ताडा फॉलने दिलेल्या परतीच्या चेंडूवर किक मारण्याचा नवाजचा प्रयत्न फसला अन् व्हॅजकेजने त्वरित धाव घेत तो चेंडू गोलजाळीत पाठवून केरला ब्लास्टर्सची आघाडी ३-० अशी मजबूत केली.

७१व्या मिनिटाला मुंबई सिटीला पेनल्टी मिळाली आणि डिएगो मॉरिसिओने त्यावर गोल करून मुंबई सिटीच्या ताफ्यात आशेचा किरण निर्माण केला. ८१व्या मिनिटाला नवाजने केरलाचा चौथा गोल अडवला. शर्थीचे प्रयत्न करूनही मुंबई सिटीला पराभव टाळता आला नाही. केरला ब्लास्टर्सने ३-१ असा विजय मिळवून उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले.

महत्त्वाच्या बातम्या-

आयएसएल: चेन्नईयनला रोखून सेमीफायनल निश्चितीचे मोहन बागानचे लक्ष्य

आयएसएल: जमशेदपूरचा डबल धमाका; प्ले-ऑफ फेरीवर शिक्कामोर्तब

क्रीडाविश्वातूनही रशियाची कोंडी! फिफासह ऑलिम्पिक संघटनेने केली कडक कारवाई

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---