के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज ‘ब’ गटातील दुसऱ्या दिवसाच्या सामन्याची सुरुवात एकतर्फी झाली. पहिले दोन्ही सामने मुंबई शहर मौर्य मेवरीक्स व परभणी पांचाला प्राईड संघांनी एकतर्फी जिंकत प्रतिस्पर्धी संघाला पराभूत केले. तिसऱ्या अटीतटीच्या लढतीत नंदुरबार संघावर नांदेड संघाने 2 गुणांनी मात दिली.
आज झालेल्या पहिल्या सामन्यात मुंबई शहर मौर्य मेवरीक्स संघाने रत्नागिरी अरावली ॲरोज संघावर 45-26 असा एकतर्फी विजय मिळवत स्पर्धेतील सलग दुसरा विजय मिळवला. मुंबई कडून राज आचार्य ने चढाईत 11 गुण मिळवले तर साहिल राणे व हर्ष लाड ने प्रत्येकी 4-4 पकडी केल्या. रत्नागिरी कडून साहिल माने ने चढाईत 8 तर भूषण गुढेकर ने 6 पकडीत गुण मिळवले.
दुसऱ्या लढतीत परभणी पांचाला प्राईड संघाने धुळे चोला वीरांस संघाचा 38-23 असा पराभूत करून सलग दुसरा विजय मिळवला. परभणीच्या प्रसाद रुद्राक्ष ने चढाईत 13 गुण तर राहुल घांडगे ने 9 पकडी करत जबरदस्त खेळ केला. आजच्या दिवसाची तिसरी लढत कट्टर प्रतिस्पर्धी संघ नंदुरबार विरुद्ध नांदेड याच्यात झाली. अटीतटीच्या या सामन्यात नांदेड संघाने जबरदस्त कमबॅक करत नंदुरबार संघावर 2 गुणांनी मात दिली. नांदेड कडून अक्षय सूर्यवंशीची खेळ महत्वपूर्ण ठरली. त्याने एकूण 13 गुण मिळवत सामना नांदेडच्या बाजूने वळवला. अजित चव्हाण ने त्याला चांगली साथ दिली तर प्रणय चांदेरे ने चांगल्या पकडी केल्या. नंदुरबार कडून ओमकार गाडे व तेजस काळभोर ने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
ठाणे हम्पी हिरोज संघाने नाशिक द्वारका डिफेंडर्स संघावर 47-24 अशी मात देत आपला पहिला विजय संपादन केला. ठाणे कडून मंगेश सोनावणे 13 गुण मिळवले व चिन्मय गुरव 7 गुण मिळवले. तर अहमद इनामदार ने 4 पकडी करत महत्वाची भूमिका निभावली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
परभणी पांचाला प्राईड ची धुळे चोला वीरांस संघावर मात
मुंबई शहर मौर्य मेवरीक्स संघाचा सलग दुसरा विजय