नाशिक द्वारका डिफेंडर्स विरुद्ध मुंबई शहर मौर्य मेवरीक्स यांच्यात झालेल्या लढतीत मुंबई शहर ने उत्तरार्धात एकतर्फी सामना करत विजय मिळवला. मुंबई शहर कडून शार्दूल पाटील ने चढाईत गुण मिळवत संघाला 5-3 अशी आघाडी मिळवून दिली असताना नाशिकच्या ऋषिकेश गडाख ने सुपर रेड करत 6-5 अशी संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर नाशिक संघाने आक्रमकता दाखवत मुंबई शहर संघाला ऑल आऊट करत आघाडी मिळवली.
मुंबई शहर ने 8-13 अश्या पिछाडीवरून जोरदार पुरागमन करत नाशिक संघावर लोन पडत आघाडी मिळवली. मध्यांतरापूर्वी मात्र मुंबई शहर कडे 22-21 अशी अवघ्या 1 गुणांची आघाडी होती. मध्यंतरा नंतर मुंबई शहराच्या शार्दूल पाटील ने सुपर टेन पूर्ण करत संघाची आघाडी वाढवली. त्याला जतिन विंदे ने चांगली साथ दिली. बचावफळीत हर्ष लाड व साहिल राणे जबरदस्त पकडी करत होते.
मुंबई शहर ने 51-34 गुणांनी जिंकत सलग दुसरा विजय साकारला. मुंबई शहर कडून शार्दूल पाटील ने चढाईत 19 गुण मिळवले तर त्याला जतिन विंदे ने 13 गुण मिळवत चांगली साथ दिली. कर्णधार हर्ष लाड ने 5 पकडी करत महत्वपूर्ण भूमिका निभावली. नाशिक संघाकडून ऋषिकेश गडाख ने 9 तर पवन भोर ने 6 गुण मिळवले.
बेस्ट रेडर- शार्दूल पाटील, मुंबई शहर मौर्य मेवरीक्स
बेस्ट डिफेंडर- हर्ष लाड, मुंबई शहर मौर्य मेवरीक्स
कबड्डी का कमाल- जतिन विंदे, मुंबई शहर मौर्य मेवरीक्स