मुंबई शहर मौर्य मेवरीक्स विरुद्ध धुळे चोला वीरांस यांच्यात लढत झाली. प्ले-ऑफस साठी पात्र होण्यासाठी मुंबई शहर ला हा सामना जिंकणे अनिवार्य होते. मुंबई शहर ने सुरुवातीपासून आक्रमक चढाया करत सामन्यात आघाडी मिळवली. मध्यंतरापर्यत मुंबई शहर ने धुळे संघावर 3 लोन पडत आघाडी मिळवली.
शार्दूल पाटीलच्या आक्रमक चढाया सामना एकतर्फी केला. पहिल्या हाफ मध्ये शार्दूल ने सुपर टेन पूर्ण केला. साहिल राणे ने अष्टपैलू खेळ केला. तर हर्ष लाड, निखिल पाटील व रुतिक पाटील पकडीत सांघिक कामगिरी करत होते. मुंबई शहर ने 42-06 अशी भक्कम आघाडी मिळवली. मध्यांतरा नंतर मुंबई शहर ने 3 बदल करत राखीव खेळाडूंना खेळण्याची संधी दिली.
संपूर्ण सामान्यात धुळे संघावर 6 वेळा ऑल आऊटची नामुष्की आली. मुंबई शहर संघाने 82-19 असा मोठा विजय मिळवत प्रमोशन व प्ले-ऑफस साठी आपले स्थान निश्चित केले. मुंबई शहर कडून शार्दूल पाटील ने सर्वाधिक 26 गुण मिळवले. तर साहिल राणे अष्टपैलू खेळ करत चढाईत 4 तर पकडीत 5 गुण मिळवले. साई चौगुले व जतिन विंदे यांनी चढाईत प्रत्येकी 8 गुण मिळवले. (Mumbai City Maurya Mavericks team qualified for promotion and play-offs)
बेस्ट रेडर- शार्दूल पाटील, मुंबई शहर मौर्य मेवरीक्स
बेस्ट डिफेंडर्स- साहिल राणे, मुंबई शहर मौर्य मेवरीक्स
कबड्डी का कमाल- जतिन विंदे, मुंबई शहर मौर्य मेवरीक्स
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबई शहर मौर्य मेवरीक्स विरुद्ध नांदेड चांबल चॅलेंजर्स सामना बरोबरीत
ठाणे हम्पी हिरोज आणि नांदेड चांबल चॅलेंजर्स प्रमोशन आणि प्ले-ऑफससाठी पात्र