एमसीएच्या (MCA) नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मुंबई क्रिकेट असोसिएशनला अजिंक्य नाईकच्या (Ajinkya Naik) रुपात नवा अध्यक्ष मिळाला. अजिंक्य नाईकनं त्यांचे प्रतिस्पर्धी संजय नाईक यांचा 100पेक्षा जास्त मतांनी पराभव केला. गेल्या आठवड्यात ही निवडणूक झाली होती. त्याचा आज निकाल लागला. या निवडणूकीत अजिंक्य नाईक (Ajinkya Naik) यांनी 107 मतांनी विजय मिळवला आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रकिया संपली आणि एकूण 375 पैकी 335 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणी झाल्यानंतर अजिंक्य नाईक (Ajinkya Naik) यांना विजयी घोषित करण्यात आलं.
तत्पूर्वी, भारताच्या माजी महिला कर्णधार डायना एडुल्जी आणि जितेंद्र गोहिल यांनी अध्यक्षपदासाठी अजिंक्य नाईकच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. अध्यक्षपदाची निवडणूक लढण्यापूर्वी अजिंक्य नाईक (Ajinkya Naik) मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (MCA) सचिव होते.
निवडणूक निकालानंतर आता अजिंक्य नाईक (Ajinkya Naik) हे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (MCA) नवे अध्यक्ष झाले आहेत. त्यांनी आशिष शेलार (Ashish Shelar) यांचे उमेदवार संजय नाईक (Sanjay Naik) यांचा 221-114 अशा मतांच्या फरकानं दारुण पराभव केला. तर क्रिकेट वर्तुळात मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) ही एक महत्त्वाची क्रिकेट संघटना आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आयसीसीचा युएसए संघावर कारवाईचा बडगा, 12 महिन्यांसाठी टीमला केले निलंबित; कारण काय?
“ही त्याच्यासाठी पहिली वेळ नाही” उथप्पाचं सॅमसनबद्दल खळबळजनक वक्तव्य
पाहा, अशी करतात फलंदाजी! गंभीरच्या भारताच्या स्टार फलंदाजाला टिप्स; सराव सत्राचा VIDEO व्हायरल