क्रिकेट विश्वातून दु:खद बातमी समोर येत आहे. मुंबईचा माजी वेगवान गोलंदाज राजेश वर्माचे रविवारी (दि. २४ एप्रिल) निधन झाले. त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने प्राणज्योत मालवली. तो ४० वर्षांचा होता. राजेश २००६-०७मधील रणजी ट्रॉफीच्या विजयी संघाचा भाग होता. ही माहिती राजेशचा मुंबई संघातील माजी सहकारी भाविन ठक्कर याने दिली. राजेशच्या निधनाने क्रीडाविश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (Rajesh Verma Died Due To Heart Attack)
राजेशची कारकीर्द
राजेश वर्माच्या (Rajesh Verma) कारकीर्दीवर नजर टाकली, तर त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये फक्त ७ प्रथम श्रेणी सामने खेळले होते. यामध्ये तो २००६ ते ०७मध्ये रणजी ट्रॉफी विजेत्या मुंबई संघाचा भाग होता. राजेशने २००२-०३ हंगामात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तसेच, तो आपला शेवटचा प्रथम श्रेणी सामना २००८ साली पंजाबविरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा