---Advertisement---

फक्त मुंबई इंडियन्सच असा पराक्रम करु शकली, हैद्राबादला मोठी संधी

---Advertisement---

मुंबई। आयपीएल 2018 च्या प्ले-आॅफच्या सामन्यांना मंगळवार, 22 मेपासुन सुरवात झाली आहे. मंगळवारी पार पडलेल्या क्वालिफायर 1च्या लढतीत चेन्नई सुपर किंग्जने हैद्रबाद सनरायझर्सचा 2 विकेट्सने पराभव करत सातव्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

या सामन्यात हैद्राबाद जरी पराभूत झाली असली तरी त्यांना अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे.

यासाठी त्यांना आज एलिमिनेटरमध्ये होणाऱ्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकता नाईट रायडर्स संघात जो विजयी होइल त्याचा क्वालिफायर 2 मध्ये सामना करावा लागणार आहे.

जर त्यांनी क्वालिफायर 2 मध्ये विजय मिळवला तर ते दुसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश करतील. तसेच जर त्यांनी आयपीएल 2018 चे विजेतेपद मिळवले तर क्वाॅलिफायर 1 मध्ये पराभूत होत विजेतेपद मिळवणारा केवळ दुसराच संघ ठरेल.

याआधी असा कारनामा फक्त मुंबई इंडियन्स संघाने केला आहे. शिवाय त्यांनी ही कामगिरी दोन वेळा 2013 आणि 2017 मध्ये केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

धोनी आणि रैनाच आहेत ट्वेंटी20 चे सुपर किंग

मग गौतम गंभीचा गेम केला तरी कुणी?

-१९ पैकी चेन्नईच्या ८ खेळाडूंना आयपीएलमध्ये मिळाला सामनावीर पुरस्कार

धोनी धोनी हैं ! हा फोटो सांगतो, धोनी का स्पेशल आहे?

चेन्नई आणि वानखेडेचं खास नातं, जुळून आला खास योगायोग

एकदा नाही तर तब्बल ११ आयपीएल रैना ठरला विराटला सरस!

एकदा १०० तर दुसऱ्यांदा ०, या खेळाडूबरोबर आयपीएलमध्ये झाला गजब विक्रम

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment