हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सनं वानखेडे स्टेडियमवर एक मोठा इतिहास रचला आहे. मुंबई इंडियन्सची टीम राजस्थान रॉयल्सविरुद्ध आयपीएलमधील त्यांचा 250 वा सामना खेळली. यासह आयपीएलमध्ये 250 वा सामना खेळणारा ही पहिली टीम बनली आहे. आयपीएलमध्ये आजपर्यंत कोणत्याही फ्रँचायझीनं इतके सामने खेळलेले नाहीत.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची टीम आहे. आरसीबीनं आयपीएलमध्ये एकूण 244 सामने खेळले आहेत. यानंतर दिल्ली कॅपिटल्स (241 सामने), कोलकाता नाईट रायडर्स (239 सामने) आणि पंजाब किंग्स (235 सामने) यांचा क्रमांक लागतो.
आयपीएल 2024 च्या 14 व्या सामन्यात, मुंबई इंडियन्सचे फलंदाज राजस्थान रॉयल्सविरुद्ध पूर्णपणे फ्लॉप झाले. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघानं 20 षटकात 9 गडी गमावून केवळ 125 धावा केल्या. सामन्यात मुंबईच्या फलंदाजांची कामगिरी सुरुवातीपासूनच खराब राहिली. पहिल्याच षटकात रोहित शर्मा आणि नमन धीर ट्रेंट बोल्टचे बळी ठरले. या सामन्यात ट्रेंटनं अत्यंत घातक गोलंदाजी केली. रोहित आणि नमन नंतर डेवाल्ड ब्रेव्हिसही खातं न उघडताच बाद झाला. यानंतर तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्यात 56 धावांची भागीदारी झाली, ज्यामुळे मुंबई इंडियन्सला 125 धावा करता आल्या.
या सामन्यात रोहित शर्माच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेल्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा दिनेश कार्तिकसह अव्वल स्थानावर पोहोचला आहे. रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत 17 वेळा शून्यावर बाद झाले. यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेलचा क्रमांक लागतो. तो आतापर्यंत 15 वेळा शून्यावर पॅव्हेलियनमध्ये गेला आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारे संघ
मुंबई इंडियन्स – 250 सामने
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – 244 सामने
दिल्ली कॅपिटल्स – 241 सामने
कोलकाता नाईट रायडर्स – 239 सामने
पंजाब किंग्स – 235 सामने
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा फलंदाज, रोहित शर्माच्या नावे लज्जास्पद विक्रम
ज्याची भीती होती तेच झालं! वानखेडेमध्ये हार्दिक पांड्याविरुद्ध जोरदार बूइंग, ‘रोहित-रोहित’च्या घोषणा
अरे चाललंय काय! एक चेंडू रोखण्यासाठी चक्क पाच जण धावले…व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही