IPLक्रिकेटटॉप बातम्या

आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा फलंदाज, रोहित शर्माच्या नावे लज्जास्पद विक्रम

आयपीएल 2024 च्या 14व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्सचे संघ आमनेसामने होते. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसननं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

प्रथम फलंदाजीला आलेल्या मुंबई इंडियन्सची सुरुवात खूपच खराब झाली. मुंबई इंडियन्सचे टॉप-3 फलंदाज एकही धाव न काढता तंबूत परतले. माजी कर्णधार रोहित शर्मा पहिल्या चेंडूवरच बाद झाला. ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीत संजू सॅमसननं यष्टीमागे त्याचा शानदार झेल घेतला. याशिवाय नमन धीर आणि डेव्हाल्ड ब्रेविस हे दोघंही खातं उघडण्यात अपयश ठरले. रोहितला बाद केल्यानंतर बोल्टनं पुढच्याच चेंडूवर नमन धीरला आपल्या जाळ्यात पायचीत केलं. त्यानं रिव्हू घेतला, मात्र त्याचा उपयोग झाला नाही.

या सामन्यात रोहित शर्माच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेल्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा दिनेश कार्तिकसह अव्वल स्थानावर पोहोचलाय. रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत 17 वेळा शून्यावर बाद झाले आहेत. यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेलचा क्रमांक लागतो. तो आतापर्यंत 15 वेळा शून्यावर पॅव्हेलियनमध्ये पोहोचला आहे.

यानंतर मुंबईच्याच पीयूष चावलाचा क्रमांक लागतो. तो देखील आयपीएलमध्ये आतापर्यंत 15 वेळा एकही धाव न काढता बाद झाला. त्याच्याशिवाय मनदीप सिंग आणि सुनील नरेनही प्रत्येकी 15 वेळा शून्यावर बाद झाले आहेत.

रोहित शर्मा मुंबई इंडियन्स व्यतिरिक्त आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्सचा भाग होता. तर दिनेश कार्तिक रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व्यतिरिक्त, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात लायन्सकडून खेळला आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेले खेळाडू

17 – रोहित शर्मा
17- दिनेश कार्तिक
15 – ग्लेन मॅक्सवेल
15-पियूष चावला
15 – मनदीप सिंग
15 – सुनील नरेन

महत्त्वाच्या बातम्या-

ज्याची भीती होती तेच झालं! वानखेडेमध्ये हार्दिक पांड्याविरुद्ध जोरदार बूइंग, ‘रोहित-रोहित’च्या घोषणा

आयपीएलच्या चीअरलीडर्सचा पगार किती असतो? एका सामन्यासाठी किती मानधन मिळतं? जाणून घ्या

कोलकाता-राजस्थान सामन्याच्या तारखेत बदल होण्याची शक्यता, जाणून घ्या कारण

Related Articles