मुंबई इंडियन्स संघाला आयपीएल २०२२मधील ३३व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध दारुण पराभवाचा सामना करावा लागला. गुरुवारी (दि. २१ एप्रिल) चेन्नईने मुंबईला ३ विकेट्सने धूळ चारली. या पराभवामुळे मुंबई या हंगामातील सर्वात फ्लॉप संघ ठरला. तसेच, त्यांच्या नावावर एका नकोशा विक्रमाचीही नोंद झाली.
या सामन्यात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आला होता. यावेळी मुंबईने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ७ विकेट्स गमावत १५५ धावा चोपल्या होत्या. हे आव्हान चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाने ७ विकेट्स गमावत अखेरच्या चेंडूवर पूर्ण केले. या पराभवासह मुंबईच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली.
आयपीएलमध्ये आतापर्यंत सुरुवातीचे सलग ७ सामने गमावण्याचा नकोसा विक्रम मुंबईच्या नावावर झाला. मुंबईने आयपीएल २०२२मधील सुरुवातीचे ७ सामने गमावलेत. त्यामुळे असा लाजीरवाणा विक्रम करणारा मुंबई पहिलाच संघ ठरला आहे.
मुंबई इंडियन्स आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ
विशेष म्हणजे, मुंबई संघ आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहे. त्यांनी आतापर्यंत ५वेळा आयपीएलचा किताब पटकावला आहे. हे पाचही किताब मुंबईने रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली जिंकले आहेत. हे ५ विजय त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० या हंगामात पटकावले आहेत. मात्र, यंदाच्या हंगामात मुंबई संघाला खास कामगिरी करता आलेली नाहीये.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
रोहित शर्माही ठरतोय फ्लॉप
विशेष म्हणजे, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माही आयपीएल २०२२मध्ये फ्लॉप ठरतोय. त्याने आतापर्यंत ७ सामने खेळले आहेत. या सामन्यात खेळताना त्याने १६.२९च्या सरासरीने ११४ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने एकही अर्धशतक झळकावण्यात यश आले नाही. या धावा करताना त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही ४१ राहिली आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे रोहितने २०२१पासून भारतीय संघाचा कर्णधार असताना सलग १४ टी२० सामने जिंकले आहेत. मात्र, त्याला या हंगामात आपल्या मुंबई इंडियन्स संघाला विजय मिळवून देता आलेला नाहीये.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीच्या विजयी चौकाराने मुंबईच्या स्वप्नांना सुरुंग! ३ विकेट्सने सामना घातला खिशात
चेन्नईच्या गोलंदाजाचा मुंबईविरुद्ध राडा! रोहित अन् इशानला शून्यावर बाद करत रचला ऐतिहासिक विक्रम
नाव मोठं अन् लक्षण खोटं! कोट्यावधी रुपयांमध्ये विकले गेलेले ‘हे’ तीन परदेशी खेळाडू ठरतायत फ्लॉप