Mumbai Indians Oval Invincibles The Hundred League: इंग्लंडची द हंड्रेड लीग संघांच्या विक्रीमुळे सतत चर्चेत आहे. आता एका नवीन अहवालात असे समोर आले आहे की मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने द हंड्रेड लीगच्या ओव्हल इनव्हिन्सिबल्समध्ये 49 टक्के हिस्सा खरेदी केला आहे. ओव्हल इन्व्हिन्सिबल्स हे या लीगचे गतविजेते आहेत आणि त्यांनी दोनदा ‘द हंड्रेड’चे विजेतेपद जिंकले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने सीव्हीसी कॅपिटल नावाच्या कंपनीला आणि इतर अनेक उच्च-प्रोफाइल गुंतवणूकदारांना हरवून या संघात हिस्सा मिळवला आहे.
इंडिया टुडेच्या अहवालनुसार, द ओव्हल इन्व्हिन्सिबल्ससाठी सर्वाधिक बोली 123 दशलक्ष पौंड होती. आता एमआयला या संघात 49 टक्के हिस्सा मिळाला असल्याने, त्यासाठी त्यांना सुमारे 60 दशलक्ष पौंड द्यावे लागतील. हे भारतीय चलनात सुमारे 645 कोटी रुपयांच्या समतुल्य आहे. यासह, ओव्हल इनव्हिन्सिबल्स हा रिलायन्स इंडस्ट्रीजच्या व्यवस्थापनाद्वारे नियंत्रित होणारा सहावा संघ बनेल. याआधी मुंबई इंडियन्सने आयपीएल आणि महिला प्रीमियर लीग (WPL) जिंकले आहे. तर मेजर लीग क्रिकेटमध्ये एमआय न्यू यॉर्क, SA20 मध्ये एमआय केप टाउन आणि ILT20 मध्ये एमआय एमिरेट्स अंबानी कुटुंबाच्या अखत्यारीत येतात.
🚨 MUMBAI INDIANS FRANCHISE IN HUNDRED LEAGUE 🚨
– Ambani’s have clinched a deal to buy the 49% stake in the Oval invincibles. [Mark Kleinman] pic.twitter.com/M45F6FCM5i
— Johns. (@CricCrazyJohns) January 30, 2025
यापूर्वी अशी अटकळ बांधली जात होती की अंबानी कुटुंब लंडनमधून चालवल्या जाणाऱ्या संघांपैकी एक खरेदी करू इच्छित होते. त्यांनी लंडन स्पिरिटवरही लक्ष केंद्रित केले होते. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनीही ओव्हल इनव्हिन्सिबल्समध्ये रस दाखवला होता. परंतु नवीन अपडेटनुसार, मुंबई इंडियन्सने बोली जिंकली आहे. द ओव्हल इन्व्हिन्सिबल्सबद्दल बोलायचे झाले तर, त्यांचा 49 टक्के हिस्सा आता अंबानी कुटुंबाकडे आहे आणि उर्वरित 51 टक्के हिस्सा सरे काउंटी क्रिकेट क्लबकडे आहे. जर सरे क्लबला भविष्यात त्यांचे शेअर्स विकायचे असतील तर एमआय फ्रँचायझी देखील या संघाची पूर्ण मालकी मिळवू शकते. अहवालानुसार, सध्या तरी सरे काउंटी क्रिकेट क्लब त्यांचे शेअर्स विकण्याच्या मनस्थितीत नाही.
हेही वाचा-
पुण्याच्या मैदानावर भारताची टी20 मधील कामगिरी कशी? जाणून घ्या आकडेवारी
AUS vs SL; मिचेल स्टार्कने रचला इतिहास, 700 विकेट्स पूर्ण करत केला खास रेकाॅर्ड
चौथ्या टी20 सामन्यासाठी स्टार फलंदाजाचे पुनरागमन, जाणून घ्या भारताची संभाव्य प्लेइंग 11