आयपीएलच्या १३ व्या सत्राला आता फक्त ७ दिवस बाकी आहेत. यावेळी सर्वच संघ परिश्रम घेताना दिसत आहेत. दरम्यान, गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज सलामीवीर फलंदाज रोहित एका हाताने स्लिपमध्ये झेल पकडताना दिसत आहे. मुंबई इंडियन्स संघाने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. मुंबई इंडियन्सच्या सराव सत्रादरम्यान रोहितने एका हाताने डाईव्ह मारत झेल घेतला आहे. व्हिडिओमध्ये रोहितने अगोदर दोन सोपे झेल पकडले. त्यानंतर तिसरा झेल घेण्यासाठी त्याने डाव्या बाजूला डाईव्ह मारली आणि झेल पकडला.
आतापर्यंत या व्हिडिओला सुमारे ७०० रीट्वीट आले आहेत, तर ५६०० पेक्षा जास्त लोकांनी याला लाईक केलं आहे. या व्हिडिओला सुमारे २८ हजार व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओसह संघाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “स्लिपमध्ये फक्त एका हाताने रोहित शर्माचा थरार.”
👀 Just another one-handed Rohit Sharma stunner in the slip cordon! 😉#OneFamily #MumbaiIndians #MI #Dream11IPL @ImRo45 pic.twitter.com/h6rykVHe1Q
— Mumbai Indians (@mipaltan) September 11, 2020
भारतात वाढत्या कोरोना व्हायरसच्या घटना लक्षात घेता आयपीएलचा १३ वा हंगाम युएईमध्ये खेळला जाणार आहे. हंगामातील पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. या हंगामातील सर्व सामने शारजाह, अबूधाबी आणि दुबई या तीन ठिकाणी खेळले जाणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-आरसीबीचा कर्णधार विराटने ‘या’ गोष्टीवर आधीपासूनच लक्ष दिले असते तर आज…
-ऑस्ट्रेलिया इंग्लंड यांच्यात आज दुसरा वनडे सामना; जाणून घ्या सर्वकाही…
-‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया लवकरच तुम्हाला तुमची चुक कळेल,’ भारतीय दिग्गजाने साधला थेट बोर्डावर निशाणा
ट्रेंडिंग लेख-
-दुसऱ्या काळात जन्न्मला असता, तर तो भारताचा अव्वल फिरकीपटू असता
-हेअरबँड घालून ऑस्ट्रेलियाला दोन-दोन विश्वचषक जिंकून देणारा दुर्लक्षित शिलेदार
-इरफानला एकाच ओव्हरमध्ये २४धावा कुटणारा ‘ज्युनियर सेहवाग’ आयपीएल गाजवायला सज्ज