आयपीएल 2023 च्या 16 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे गुणतालिकेत खालच्या स्थानी असलेले संघ आमने-सामने आले. पहिल्या विजयासाठी प्रयत्नशील असलेल्या मुंबई इंडियन्स संघासाठी रोहित शर्माने सर्वाधिक योगदान दिले. त्याने अर्धशतक पूर्ण करत एक मोठा दुष्काळ संपवला.
Skipper @ImRo45 leading from the front and how! 💪
A fine half-century comes up for the #MI captain, who's going strong at the moment along with Tilak Varma at the other end 👌👌
Follow the match ▶️ https://t.co/6PWNXA2Lk6#TATAIPL | #DCvMI pic.twitter.com/qBI8V0fwk4
— IndianPremierLeague (@IPL) April 11, 2023
प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने या सामन्यात संघर्ष करत 172 धावा उभ्या केल्या. या धावांचा पाठलाग करताना मुंबईला कर्णधार रोहित शर्मा व ईशान किशन यांनी 7.3 षटकात 71 धावांची सलामी दिली. ईशान धावबाद झाल्यानंतर रोहितने आपली खेळी पुढे नेली. त्याने आपल्या खेळीचे रूपांतर अर्धशतकात करताना संघाला विजयाच्या दिशेने नेले. रोहितने हे अर्धशतक 29 चेंडूंवर पूर्ण केले. यामध्ये 4 चौकार व 4 षटकारांचा समावेश होता. रोहितचे हे अर्धशतक तब्बल 808 दिवसानंतर आले. रोहितने या सामन्यात बाद होण्यापूर्वी 45 चेंडूवर 65 धावा केल्या. यामध्ये सहा चौकार व चार षटकारांचा समावेश होता.
या सामन्याचा विचार केल्यास दिल्लीने कर्णधार डेव्हिड वॉर्नर व उपकर्णधार अक्षर पटेल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 172 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना मुंबईसाठी रोहित शर्मा याने अर्धशतक झळकावले. ईशान किशन व तिलक वर्मा यांनी महत्त्वपूर्ण योगदान देत संघाला विजयाच्या दिशेने नेले. अखेर कॅमेरून ग्रीन व टीम डेव्हिड यांनी अखेरच्या चेंडूवर संघाचा विजय साकार केला.
(Mumbai Indians Captain Rohit Sharma Complete Half Century After 808 Days In IPL)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पीसीबी मोठे नुकसान झेलण्यासाठी तयार? भारत आशिया चषकात खेळला नाही तर…
मी चांगलाच खेळलो! वाचा 20 चेंडूत 18 धावा करणारा केएल राहुलचे काय म्हणाला