मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील रोमांचक लढत चाहत्यांना रविवारी (30 एप्रिल) अनुभवता आली. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 212 अशी मोठी धावसंख्या उभी केली. प्रत्युत्तरात मुंबईच्या फलंदाजांनीही तितक्याच आक्रमकपणे तीन चेंडू राखून धावांचा पाठलाग केला. मुंबईचा हा स्पर्धेतील चौथा विजय ठरला. मात्र, हा विजय मिळवला असला तरी मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याला बाद देण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.
राजस्थानने विजयासाठी दिलेल्या 213 धावांचा पाठलाग करताना मुंबईला चांगल्या सलामीची अपेक्षा होती. मात्र, बर्थडे बॉय कर्णधार रोहित शर्मा हाच अपयशी ठरला. दुसऱ्याच षटकात संदीप शर्मा याने त्याचा त्रिफळा उडवला. रोहित पाच चेंडूंवर केवळ तीन धावा करू शकला. मात्र, रोहित बाद होण्याचा निर्णय वादात सापडल्याचे दिसते.
Rohit Sharma was not out. pic.twitter.com/BnUc4OwwSA
— MI Fans Army™ (@MIFansArmy) April 30, 2023
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये संदीप शर्मा याचा चेंडू बेल्सला चाटून गेल्याचे दिसते. मात्र, ती बेल्स यष्टीरक्षण करत असलेल्या संजू सॅमसन यांच्या ग्लोव्हजमूळे पडल्याचे दिसून येत आहे. सामन्यात हा निर्णय मैदानी पंचांनी दिला त्यामुळे सोशल मीडियावर पंचांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जातेय.
Rohit Sharma is Not Out?https://t.co/8FClqYKwm3
— CricketGully (@thecricketgully) April 30, 2023
या सामन्याचा विचार केल्यास राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. राजस्थान संघासाठी या सामन्यात केवळ सलामीवीर यशस्वी जयस्वाल हाच झुंज देऊ शकला. आपल्या घरच्याच मैदानावर खेळत असलेल्या यशस्वी याने 62 चेंडूवर 124 धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली होती. मात्र, सूर्यकुमार यादवने वादळी अर्धशतक झळकावत संघाला विजयाच्या दिशेने नेले. अखेरीस टीम डेविड याने 14 चेंडूवर नाबाद 45 धावा करून संघाला विजय मिळवून दिला.
(Mumbai Indians Captain Rohit Sharma Controversial Dismissal Against Rajasthan Royals In IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बर्थडे दिवशी रोहित ठरतो कमनशिबी! आजवर आयपीएलमध्ये राहिलीये अशी कामगिरी
पंजाबकडून हरल्यावर धोनीने लावली गोलंदाजांची क्लास! म्हणाला, ‘त्यांना माहिती हवं की…’