---Advertisement---

पंजाबविरुद्ध पराभवानंतर रोहित शर्माला झाला लाखो रुपयांचा दंड…

On: रविवार, मार्च 31, 2019 12:41 PM
---Advertisement---

आयपीएल 2019 मध्ये शनिवारी(30 मार्च) मोहाली येथे किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात सामना पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सला 8 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला.

याबरोबरच मुंबईचा कर्णधार रोहित शर्मालाही षटकांची गती कमी राखल्याने 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

आयपीेएलच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की ‘आयपीएलच्या आचारसंहितेच्या किमान षटकांची गती या नियमाअंतर्गत षटकांची गती कमी राखल्याचा हा मुंबई संघाचा हा या मोसमातील पहिलाच गुन्हा आहे. शर्माला 12 लाखांचां दंड ठोठावला आहे.’

या सामन्यात मुंबईकडून डिकॉकने 60 धावांची अर्धशतकी खेळी केली.यात त्याने 6 चौकार आणि 2 षटकार मारले. तसेच हार्दिक पंड्याने 19 चेंडूत 31 धावांची छोटीखानी तुफानी खेळी केली. त्यामुळे मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 176 धावा केल्या आणि पंजाब समोर 177 धावांचे आव्हान ठेवले.

हे आव्हान पंजाबने 18.4 षटकातच सहज पूर्ण केले. पंजाबकडून केएल राहुलने 57 चेंडूत नाबाद 71 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 1 षटकार मारले. तसेच ख्रिस गेलने 40 आणि मयंक अगरवालने 43 धावांची खेळी केली.

महत्त्वाच्या बातम्या – 

आर अश्विनने एकाच षटकात टाकले चक्क सात चेंडू…

युसुफ पठाणने अर्धशतक केले तर या चाहत्याच्या रिक्षातून प्रवाशांचा होणार विनामुल्य प्रवास…

रोहित शर्माला नाबाद असतानाही डीकॉकमुळे परतावे लागले पॅव्हिलियनमध्ये, पहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment