मोहाली। आज(30 मार्च) आयपीएल 2019 मधील नववा सामना किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सुरु आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना किंग्ज इलेव्हन पंजाब समोर 177 धावांचे आव्हान ठेवले आहे.
मुंबईकडून कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक या सलामीवारांच्या जोडीने फलंदाजीला शानदार सुरुवात केली होती. त्यांनी 5.2 षटकात 51 धावांची अर्धशतकी भागीदारीही रचली होती. मात्र ही भागीदारी हार्डस विल्जोएन या गोलंदाजाने तोडली.
त्याने रोहितला 32 धावांवर पायचीत बाद केले. पण यावेळी रोहितने त्याचा साथीदार डीकॉककडे रिव्ह्यू घेऊ की नको यासाठी सल्ला विचारला. पण डीकॉकने यासाठी रोहितला नकार दिला.
मात्र नंतर जेव्हा रिप्ले पाहण्यात आले तेव्हा दिसले की चेंडू स्टंपला लागत नव्हता, तर लेग साईडला जात होता. पण तोपर्यंत उशीर झाला होता. त्यामुळे रोहितला नाबाद असतानाही चूकीच्या निर्णयामुळे बाद होत पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.
तसेच यावेळी मैदानावरील पंच विनीत कुलकर्णी यांच्यावर चाहते राग व्यक्त करत आहेत. याआधी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्समध्ये झालेल्या सामन्यातही पंचांकडून काही चूकीचे निर्णय देण्यात आले होते.
आज चालू असलेल्या सामन्यात मुंबईकडून डिकॉकने 60 धावांची अर्धशतकी खेळी केली.यात त्याने 6 चौकार आणि 2 षटकार मारले. तसेच हार्दिकने 19 चेंडूत 31 धावांची छोटीखानी तुफानी खेळी केली. त्यामुळे मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 176 धावा केल्या.
M09: KXIP vs MI – Rohit Sharma Wicket https://t.co/w5hfEy6Lry
— amit kumar (@amitkum66253697) March 30, 2019
महत्त्वाच्या बातम्या –
–Video: शतकी खेळी करणारा सॅमसन वॉर्नरला म्हणाला, ‘तू माझा दिवस खराब केलास’
–गोलंदांजाना जमले नाही, पण एका पिझ्झाबॉयने थांबवला होता संजू सॅमसनचा धूमाकूळ, पहा व्हिडिओ
–विराट म्हणतो, या कारणामुळे मुंबई इंडियन्स आहे लकी…





