हैद्राबाद। शुक्रवारी आयपीएल 2019 मध्ये 8 सामना सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात पार पडला. रोमांचकारी झालेल्या या सामन्यात हैद्राबादने 5 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात दोन्ही संघांकडून आक्रमक फलंदाजी पहायला मिळाली.
राजस्थानकडून सॅमसनने 55 चेंडूत नाबाद 102 धावा केल्या. या खेळीत त्याने 10 चौकार आणि 4 षटकारांची बरसात केली. या आयपीएल मोसमातील हे पहिलेच शतक आहे. मात्र त्याच्या या शतकावर हैद्राबादकडून डेव्हिड वॉर्नरने केलेल्या तुफानी अर्धशतकी खेळीमुळे पाणी फेरले गेले.
वॉर्नरने हैद्राबादकडून 39 चेंडूत 69 धावांची अर्धशतकी खेळी केली. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 2 षटकार मारले. तसेच त्याने जॉनी बेअरस्टोसह सलामीला 110 धावांची भागीदारी केली. बेअरस्टोने 28 चेंडूत 45 धावा केल्या. त्यामुळे राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना दिलेले 199 धावांचे आव्हान हैद्राबादने 19 व्या षटकात सहज पार केले.
या सामन्यानंतर वॉर्नरने सॅमसनची मुलाखत घेतली आहे. यात सॅमसनने वॉर्नरला म्हटले की ‘तूझ्यामुळे माझा दिवस वाया गेला.’ या मुलाखतीचा व्हिडिओ आयपीएलने शेअर केला आहे.
या मुलाखतीत सॅमसनने म्हटले आहे की ‘तू माझा दिवस खराब केला. ज्याप्रकारे तू फलंदाजी केली ते पाहून माझे शतक अपूरे होते. जशी तू फलंदाजीची सुरुवात केली, आम्ही पॉवरप्लेमध्येच सामना हरलो. तूझ्यासारखे प्रतिस्पर्धी असल्यावर आम्हाला 250 धावा धावफलकावर लावण्याची गरज होती. हे शतक खास होते.’
त्याचबरोबर वॉर्नर सॅमसनचे कौतुक करताना म्हणाला, ‘संजूची खेळी खूप चांगली होती, सर्व श्रेय त्याला जाते. त्यामुळे आमची सुरुवात चांगली झाली नाही. त्याने स्वत:साठी वेळ घेतला आणि नंतर चांगला खेळ केला.’
‘खरंतर मला वाटले नव्हते या खेळपट्टीवर 200 धावा होतील. आम्ही अशा खेळपट्टीवर खेळलो, ज्यावर जर गोलंदाजाने योग्य लेंन्थने गोलंदाजी केली तर आव्हानाचा पाठलाग करने अवघड होते. पण संजूमुळे आम्हाला समजले की या खेळपट्टीवर कशी फलंदाजी करायची.’
याबरोबरच वॉर्नरने बेअरस्टोबरोबर केलेल्या भागीदारीबद्दल म्हटले आहे की ‘मी आणि जॉनी कोलकतापासून चांगली भागीदारी करत आहे.’ तसेच चाहत्यांबद्दल वॉर्नर म्हणाला, हैद्राबादचे चाहते कमाल आहेत. चाहत्यांसमोर सामना खेळण्याची मी मजा घेत आहे.
.@davidwarner31: Fantastic innings mate! Well played! @IamSanjuSamson: David, you destroyed my day, my 100 was not enough!!
The duo played stunning yet contrasting knocks for @rajasthanroyals and @SunRisers – by @28anand.#VIVOIPL #SRHvRR
????https://t.co/CNZz2JfzHR pic.twitter.com/JOJLa9o6X9
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2019
महत्त्वाच्या बातम्या –
–गोलंदांजाना जमले नाही, पण एका पिझ्झाबॉयने थांबवला होता संजू सॅमसनचा धूमाकूळ, पहा व्हिडिओ
–विराट म्हणतो, या कारणामुळे मुंबई इंडियन्स आहे लकी…
–युवराजच्या षटकारांच्या हॅट्रिकनंतर चहलला आठवला स्टुअर्ट ब्रॉड, पहा काय म्हणाला…






