यंदाच्या महिला प्रीमियर लीगच्या हंगामात (Women Premier League 2025) हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने चमकदार कामगिरी करत फायनल फेरी गाठली. संघाने फायनलमध्येही धमाकेदार कामगिरी करत डब्ल्यूपीएलच्या ट्राॅफीवर दुसऱ्यांदा नाव कोरले. फायनलमध्ये मुंबईने दिल्ली कॅपिटल्सचा 8 धावांनी धुव्वा उडवला. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार कर्णधार हरमनप्रीत कौरला देण्यात आला. (Player Of The Match Harmanpreet Kaur) या विजयासह मुंबईने अनेक रेकाॅर्ड्स केले.
फायनल सामना जिंकून मुंबई इंडियन्सने इतिहास रचला आहे. फायनल सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने दिल्लीला 150 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात दिल्ली संघाला फक्त 141 धावा करता आल्या.
मुंबई इंडियन्सने फायनल सामना जिंकून एक खास रेकाॅर्ड केला. एकाच मैदानावर सर्वाधिक सामने जिंकण्याच्या बाबतीत मुंबईचा संघ शीर्ष स्थानी पोहोचला आहे. मुंबईने आतापर्यंत ब्रेबॉर्न स्टेडियमवर एकूण 7 सामने जिंकले आहेत. या बाबतीत मुंबईने दिल्ली कॅपिटल्सला मागे टाकले आहे. बंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर दिल्लीने 6 सामने जिंकले आहेत.
फायनलमध्ये हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) 44 चेंडूंत 66 धावा केल्या. दरम्यान तिने 9 चौकारांसह 2 षटकार लगावले. या कारणास्तव हरमनप्रीतला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. तर नॅट सायव्हर ब्रंटने 30 धावा केल्या. प्रत्युत्तरात, दिल्ली कॅपिटल्स संघाला फक्त 141 धावा करता आल्या. दिल्लीसाठी मारिझॅन कॅपने 40 धावांची खेळी खेळली. जेमिमा रॉड्रिग्जने 30 धावांची खेळी खेळली. निक्की प्रसाद 25 धावांवर नाबाद राहिली.
अशा प्रकारे मुंबई इंडियन्सने फायनलमध्ये शानदार विजय मिळवत इतिहास रचला. मुंबईचा संघ महिला प्रीमियर लीगच्या इतिहासात 2 विजेतेपद जिंकणारा पहिलाच संघ ठरला. पहिल्याच हंगामात मुंबईने जेतेपदावर आपले नाव कोरले होते. त्यानंतर दुसऱ्या हंगामात स्म्रीती मानधनाच्या नेतृत्वाखाली राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूने विजेतेपद पटकावले. तिसऱ्या हंगामात मुंबईने पुन्हा एकदा हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली ट्राॅफी जिंकली.
#TATAWPL 2025, you have been incredible 🙌
— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 15, 2025
📸📸 We leave you with the 𝗖𝗛𝗔𝗠𝗣𝗜𝗢𝗡𝗦 of this edition- 𝐌𝐮𝐦𝐛𝐚𝐢 𝐈𝐧𝐝𝐢𝐚𝐧𝐬 🏆#DCvMI | #Final | @mipaltan pic.twitter.com/yyyfVVAog3