इंडियन प्रीमियर लीग 2023च्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्स संघ जिंकला. लखनऊ सुपर जायंट्स आपल्या दुसऱ्या हंगामातही अंतिम सामन्यापर्यंत पोहोचू शकला नाही. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झालेल्या या लढतीत मुंबईने 81 धावांनी विजय मिळवला. आकाश मधवाल मुंबईच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 182 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात लखनऊ सुपर जायंट्स संघ 16.3 षटकांमध्ये 101 धावांपर्यंत मजल मारू शकला. मार्कस स्टॉयनिस संपूर्ण हंगामाप्रमाणे या सामन्यातही लखनऊसाठी मॅच विनर ठरणार असे वाटत होते. मात्र, टिम डेविड आणि ईशान किशनने योग्य ताळमेळ साधल्याने तो धावबाद झाला. स्टॉयनिसने लखनऊसाठी 27 चेंडूत सर्वाधिक 40 धावांची खेळी केली. मुंबईसाठी कॅमरून ग्रीन याने सर्वाधिक 41 धावांचे योगदान देऊ शकला. मुंबईचा वेगवान गोलंदाज आकाश मधवाल याने आपल्या 3.3 षटकांमध्ये 5 धावा खर्च करून 5 विकेट्स घेतल्या आहेत.
उभय संघांतील या सामन्यात दोन्ही संघांमधील एकही फलंदाज अर्धशतक करू शकला नाही. मात्र गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. मुंबईसाठी आकाश मथवालने केलेले कामगिरी लखनऊसाठी नवीन उल हक याने केली. नवीनने चार षटकात 38 धावा खर्च करून चार विकेट्स घेतल्या. लखनऊचा यश ठाकूर चार षटकात 34 धावा खर्च करून तीन विकेट्स घेऊ शकला. रवी बिश्नोई आणि पियुष चावला या दोन्ही फिरकी गोलंदाजांनी आपल्या-आपल्या संघांसाठी प्रत्येकी एका विकेट घेतली. आकाश मधवालने केलेले प्रदर्शन आयपीएल इतिहासात एखाद्या अनकॅप्ड खेळाडूचे सर्वोत्तम प्रदर्शन ठरले आहे.
मुंबई इंडियन्स या विजयानंतर क्वॉलिफायर दोनमध्ये गुजरात टायटन्सशी भिडणार आहे. मुंबई आणि गुजरात संघातील क्वॉलिफायर सामना शुक्रवारी (26 मे) खेळला गेला. उभय संघांतील ही लढत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होईल. क्वॉलिफायर दोनमध्ये जिंकणारा संघ अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळेल. रविवारी (28 मे) आयपीएल 2023चा अंतिम सामना अहमदाबादमध्येच खेळला जाईल. (Mumbai Indians defeated Lucknow Super Giants by 81 runs in the eliminator match)
बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अर्रर्र! नवीनच्या माऱ्यापुढे विस्फोटक सूर्या-ग्रीनने टेकले गुडघे, एकाच ओव्हरमध्ये मुंबईचा खेळ खल्लास
CSKला फायनलमध्ये पोहोचवताच पथिरानाने आईला मारली मिठी; भावूक व्हिडिओ तुमच्याही काळजाला भिडेल