---Advertisement---

WPL2023 । पराभवाचा वचपा काढत मुंबईची फायनलमध्ये दिमाखात एन्ट्री; इलिमिनेटर सामन्यात यूपी वॉरियर्सची धुळधाण

On: शुक्रवार, मार्च 24, 2023 10:46 PM
MIW
---Advertisement---

इंग्लंडची नवखी वेगवान गोलंदाज ईस वाँग हिने शुक्रवारी (24 मार्च) डब्ल्यूपीएलच्या एलिमिनेटर सामन्यात जबरदस्त प्रदर्शन केले. परिणामी मुंबई इंडियन्स संघ अंतिम सामन्यात पोहोचला. यूपी वॉरिअर्सला 72 धावांनी या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. मुंबईच्या खेळाडूंनी प्रथम फलंदाजी आणि नंतर गोलंदाजी या दोन्ही विभागांमध्ये नेत्रदीपक कामगिरी करत विजय मिळवला. आता डब्लूपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स अशी लढत चाहत्यांना पाहायला मिळेल.

हरमनप्रीत कौह हिच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सने या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. निर्धारित 20 षटकांमद्ये मुंबईने 4 बाद 182 धावा कुटल्या. प्रत्युत्तरात यूपी वॉरिअर्स संघाने 110 धावा करून सर्वबाद झाला. फलंदाजी विभागात मुंबई इंडियन्ससाठी नेट सायव्हर ब्रंड (Nat Sciver-Brunt) हिने सर्वाधिक 72 धावांची नाबाद खेळी केली. यामध्ये 9 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. या अप्रतिम खेळीसाठी ब्रंडला सामनावीर पुरस्कार देखील दिला गेला. त्याव्यतिरिक्त मुंबईची एकही फलंदाज 30 पेक्षा अधिक धावांची खेळी करू शकली नाही. एमेलिया केर हिने 29 धावांचे योगदान दिले आणि ती संघासाठी दुसरा सर्वात मोठी खेळी करणारा फलंदाज ठरली.

https://twitter.com/wplt20/status/1639310119774355462?s=20

 

यूपी वॉरिअर्सला जिंकण्यासाठी मुंबईने 183 धावांचे लक्ष्य दिले होते, जे त्यांना गाठता आले नाही. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेला यूपी संघ अवघ्या 17.4 षटकात सर्वबाद झाला. यूपीसाठी किरण नवगिरे () हिने सर्वाधिक 43 धावांचे योगदान दिले. संघाची वरची फळी अवघ्या 21 धावा करून बाद झाली होती. मुंबईसाठी वेगवान गोलंदाज इझी वाँग () हिने या सामन्यात सर्वोत्तम प्रदर्शन केले, असे आपण म्हणू शकतो. वाँगने 4 षटकात 15 धावा करून सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. यूपीच्या डावीतील 13 व्या षटकात वाँगने आपली विकेट्सची हॅट्रिक देखील पूर्ण केली. डब्लूपीएलच्या इतिहासातील ही पहिलीच हॅट्रीक असून हा मोठा विक्रम वाँगच्या नावावर नोंदवला गेला.

दरम्यान, या विजयानंतर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघ डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच अंतिम सामन्यात भिडणार आहेत. उभय संघांतील हा सामना रविवारी (26 मार्च) मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
(Mumbai Indians defeated UP Warriors in the eliminator match)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! मुंबईच्या इसाबेल वोंगने रचला इतिहास, WPLमध्ये हॅट्रिक घेणारी पहिली गोलंदाज, ‘या’ 3 वॉरियर्सला धाडलं तंबूत
Video: इंग्लंडच्या पंतप्रधानांनी केला आपल्याच देशाच्या घातक वेगवान गोलंदाजांचा सामना, जॉर्डनने घेतली विकेट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---