नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअमवर पार पडलेल्या एलिमिनेटर सामना मुंबई इंडियन्स महिला संघाने 72 धावांनी जिंकला. शुक्रवारी (दि. 24 मार्च) खेळल्या गेलेल्या महिला प्रीमिअर लीग 2023 मधील या एलिमिनेटर सामन्यात मुंबई संघाला अंतिम सामन्याचे तिकीट मिळवून देताच कर्णधार हरमनप्रीत कौर हिने इतिहास रचला. हरमनप्रीत ही महिला प्रीमिअर लीग स्पर्धेत आपल्या संघाला अंतिम सामन्यात नेणारे पहिली भारतीय कर्णधार बनली. मात्र, आयपीएलमध्ये अशी कागमिरी कोणत्या खेळाडूने केली होती, चला जाणून घेऊयात…
सामन्याचा आढावा
मुंबई इंडियन्स महिला विरुद्ध यूपी वॉरियर्झ महिला (Mumbai Indians Women vs UP Warriorz Women) संघातील नाणेफेक एलिसा हिली हिने जिंकली होती. यावेळी तिने गोलंदाजीचा निर्णय घेत हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिच्या नेतृत्वातील मुंबईला फलंदाजीसाठी पाचारण केले. यावेळी मुंबईने नॅट सायव्हर-ब्रंट हिच्या नाबाद 72 धावांच्या जोरावर 20 षटकात 4 विकेट्स गमावत 182 धावा केल्या होत्या. हे आव्हान पार करताना यूपीच्या नाकी नऊ आल्या. त्यांना 17.4 षटकात 10 विकेट्स गमावत 110 धावाच करता आल्या. मुंबईकडून इझी वोंग (Issy Wong) हिने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. ती स्पर्धेत हॅट्रिक घेणारी पहिली महिला खेळाडूही ठरली. यासह मुंबईने हा सामना 72 धावांनी खिशात घातला.
https://twitter.com/mipaltan/status/1639314639535194130
हरमनप्रीत कौरने रचला इतिहास
हा सामना जिंकत मुंबई इंडियन्स महिला (Mumbai Indians Women) संघाने डब्ल्यूपीएल 2023 (WPL 2023) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक दिली. यामुळे हरमनप्रीत कौर ही आपल्या संघाला डब्ल्यूपीएलमध्ये अंतिम सामन्यात पोहोचवणारी पहिली भारतीय कर्णधार ठरली. विशेष म्हणजे, 7 नंबरची जर्सी घालणाऱ्या हरमनप्रीतचा अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लॅनिंग हिच्याशी सामना होणार आहे.
https://twitter.com/mipaltan/status/1639315725272727559
आयपीएलमध्ये कुणी केलेली अशी कामगिरी?
याव्यतिरिक्त आयपीएल इतिहासात आपल्या संघाला अंतिम सामन्यात पोहोचवणारा पहिला भारतीय कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) होता. धोनीने आयपीएलच्या पहिल्या हंगामात म्हणजेच आयपीएल 2008 (IPL 2008) स्पर्धेत आपल्या चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाला अंतिम सामन्यात नेले होते. त्यावेळी अंतिम सामन्यात 7 नंबरची जर्सी घालणाऱ्या धोनीसमोर ऑस्ट्रेलियाचाच कर्णधार होता. शेन वॉर्न (Shane Warne) याच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाने चेन्नईला 3 विकेट्सने पराभूत करत आयपीएलची पहिली-वहिली ट्रॉफी आपल्या नावावर केली होती.
नवा इतिहास घडणार का?
अशात आता महिला प्रीमिअर लीग 2023 (Womens Premier League 2023) स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (दि. 26 मार्च) मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स महिला विरुद्ध मुंबई इंडियन्स महिला (Delhi Capitals Women vs Mumbai Indians Women) संघ आमने-सामने असणार आहेत. अशात हरमनप्रीत धोनीप्रमाणेच पहिल्या हंगामातील सामना गमावते की, विजय मिळवत नवा इतिहास घडवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (mumbai indians harmanpreet kaur is the first indian captain to lead a team in wpl final)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! मुंबईच्या इसाबेल वोंगने रचला इतिहास, WPLमध्ये हॅट्रिक घेणारी पहिली गोलंदाज, ‘या’ 3 वॉरियर्झला धाडलं तंबूत
WPL2023 । पराभवाचा वचपा काढत मुंबईची फायनलमध्ये दिमाखात एन्ट्री; इलिमिनेटर सामन्यात यूपी वॉरियर्सची धुळधाण