आयपीएल 2025 स्पर्धा (IPL 2025) आता अंतिम टप्प्यावर पोहोचलेली आहे. स्पर्धेत शुक्रवारी म्हणजेच (30 मे) रोजी एलिमिनेटर सामना खेळला जाणार आहे. जिथे गुजरात टायटन्स संघाचा सामना पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians vs Gujrat Titans) संघाशी होणार आहे. हा सामना मुलांपूरच्या महाराजा यादवेंद्र सिंग स्टेडियममध्ये खेळला जाईल. या सामन्याआधी मुंबई इंडियन्सला मोठा झटका बसलेला आहे. जिथे दीपक चाहर (deepak chahar) आणि तिलक वर्मा (Tilak verma) यांना दुखापत झाली आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दीपक चाहर एअरपोर्टवर दिसला ज्यामध्ये चालताना त्याला थोडासा संघर्ष करावा लागत आहे. तिलक वर्माची या हंगामात म्हणावी तितकी प्रभावी कामगिरी झालेली नाही. त्याने 14 सामन्यात केवळ 274 धावा केल्या आहे. दुसरीकडे चाहरने आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्ससाठी 14 सामन्यात 11 विकेट्स घेतल्या आहेत.
दीपकसाठी दुखापत नवीन नाही, त्याला पाठ दुखी देखील नेहमी सतावत असते. त्याला आयपीएल 2025 मेगा लिलावाआधी चेन्नई सुपर किंग्सने रिलीज केले होते. त्यानंतर मुंबई इंडियन्सने त्याला 9.25 करोड रुपयांना खरेदी केले.
तिलकला पंजाब किंग्स (PBKS vs Mi) विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात घुटण्यामध्ये दुखापत झाली होती. त्याला सामन्यात रिटायर्ड आऊट करण्यात आले होते. जो एक वादग्रस्त निर्णय होता त्यानंतर हार्दिक पांड्याने (hardik pandya) खुलासा केला होता की, त्याला हाताला लागले ज्यामुळे संघाला तसा निर्णय घ्यावा लागला.






