---Advertisement---

मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर? टॉप-4 मध्ये येण्यासाठी आता काय करावं लागेल? जाणून घ्या

---Advertisement---

आयपीएल 2024 मुंबई इंडियन्सची कामगिरी फारच निराशाजनक राहिली आहे. संघानं आतापर्यंत 9 सामने खेळले, ज्यापैकी त्यांना फक्त 3 सामन्यांमध्ये विजय नोंदवता आला आहे. मुंबई सध्या 6 अंकांसह गुणतालिकेत 9व्या स्थानावर आहे. शनिवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 10 धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर मुंबईच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मुंबईचे अजून 5 सामने बाकी आहेत. चला तर मग जाणून घेऊया, मुंबई इंडियन्स अजूनही प्लेऑफसाठी पात्र ठरू शकते की नाही.

मुंबई इंडियन्सचं प्लेऑफमध्ये जाण्याचं समीकरण
मुंबई इंडियन्ससाठी प्लेऑफमध्ये पोहोचण्याचं गणित फार सोपं आहे. त्यांना उर्वरित त्यांचे सर्व 5 सामने जिंकावे लागतील, बस्स! पुढील 5 सामने जिंकल्यास त्यांचं टॉप-4 मधील स्थान निश्चित होईल. तसं पाहिलं तर, पुढील 5 सामन्यांमध्ये 4 विजय देखील मुंबईला प्लेऑफमध्ये नेऊ शकतात. परंतु अशावेळी त्यांना इतर सामन्यांच्या निकालांवरही अवलंबून राहावं लागेल.

पुढील 5 सामन्यांमध्ये मुंबई सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्सशी प्रत्येकी दोन वेळा होईल. शिवाय त्यांना एक सामना सनरायझर्स हैदराबादशीही खेळायचा आहे. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी जर-तर च्या स्थितीत अडकून राहायचं नसेल तर मुंबईला पुढील सर्व सामने जिंकावेच लागतील.

मुंबई इंडियन्सचा शेवटच्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभव झाला आहे. त्यांना प्रथम राजस्थान रॉयल्सविरुद्ध 9 विकेट्सनं दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं. तर आता दिल्ली कॅपिटल्सनंही त्यांना 10 धावांनी पराभूत केलं आहे. मुंबईचा पुढील सामना लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध असेल, जे अतिशय चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. लखनऊचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.

दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादनं गेल्या वेळी मुंबईविरुद्ध 277 धावा ठोकल्या होत्या. त्यामुळे पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्ससाठी येथून पुढे प्लेऑफचा रस्ता फार अवघड आहे असंच दिसतं.

महत्त्वाच्या बातम्या – 

फक्त चौकार-षटकारांमध्ये डील करणार जेक फ्रेझर मॅकगर्क आहे तरी कोण? त्याचा आयपीएलचा पगार किती?

दिल्ली कॅपिटल्सचा दणदणीत विजय, घरच्या मैदानावर दिला मुंबई इंडियन्सला धोबीपछाड

पांड्या-बुमराह कोणालाच सोडलं नाही! ‘मॅकगर्क’ नावाच्या वादळासमोर मुंबईचे गोलंदाज पाचोळ्यासारखे उडाले

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---