आयपीएल 2024 मध्ये शनिवारी (दि. 27) दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा दारूण पराभव केला. मुंबईला दिल्लीकडून 10 धावांनी पराभव स्विकारावा लागला. या पराभवासह मुंबईच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा धुसर झाल्या आहेत. आधीच पराभवाच्या गर्तेत असलेल्या मुंबईच्या संघाला आता आणखीन एक धक्का बसला आहे. मुंबई इंडियन्सचा विकेटकीपर फलंदाज इशान किशनवर कारवाई करण्यात आली आहे.
दिल्लीविरूद्धच्या सामन्यादरम्यान आयपीएल आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी इशानवर कारवाई केली आहे. यासोबतच त्याला मॅच फीच्या 10 टक्के दंडही ठोठावण्यात आला आहे. इशानने देखील आपली चूक मान्य केली आहे. ( Mumbai Indians Ishan Kishan reprimanded fined 10 per cent of match fee for breach of IPL Code of Conduct )
आयपीएलच्या निवेदनानुसार, “किशनने आयपीएलच्या आचारसंहितेच्या कलम 2.2 अंतर्गत लेव्हल 1 चा गुन्हा केला आहे. त्याने गुन्हा कबूल केला आहे आणि पंचांनी ठोठावलेला दंडही मान्य केला आहे. लेव्हल 1 च्या आचारसंहितेच्या उल्लंघनासाठी, मॅच रेफरीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक आहे.”