आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सने रविवारी झालेल्या सामन्यात विजयाची खाते उघडले. दिल्लीचा पराभव करत मुंबईने आयपीएलच्या या हंगामातील पहिला विजय मिळवला. मुंबईच्या या विजयात संघातील अनेक खेळाडूंनी महत्वाची भुमिका निभावली आणि संघाचा विजय सुकर केला. त्यातही दिल्लीपुढे दिलेल्या 235 धावांचे आव्हान राखताना मुंबईच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. यात सिंहाचा वाटा होता तो जसप्रीत बुमराहचा. ( mumbai indians jasprit bumrah creates history becomes first indian to take 150 ipl wickets for one team )
दिल्ली कॅपिटल्सला नमवून यजमान मुंबईने विजयाचे खाते उघडले. या सामन्यात घातक गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या जसप्रीत बुमराहने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. जसप्रीत बुमराहने दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ याला अप्रतिम यॉर्करवर तंबूत धाडले. तेव्हा शॉ 40 चेंडूत 66 धावांवर खेळत होता. ही विकेट मुंबईसाठी अत्यंत महत्वाची होती. त्यांनंतर बुमराहने अभिषेक पोरेललाही बाद केले. अभिषेक पोरेलला बाद करताच बुमराहने ऐतिहासिक कामगिरी केली.
पोरेलच्या विकेट्ससह जसप्रीत बुमराह आयपीएलमध्ये लसिंथ मलिंगानंतर मुंबईसाठी 150 बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला. तसेच आयपीएच्या इतिहासात एका संघासाठी 150 बळी घेणारा बुमराह तिसरा खेळाडू ठरलाय. या यादीत लसिथ मलिंगा आणि सुनील नरेन यांचा देखील समावेश आहे. लक्षणीय बाब म्हणजे एका संघासाठी 150 बळी घेणारा बुमराह हा पहिला भारतीय शिलेदार ठरला आहे.
आयपीएलमध्ये एका संघासाठी सर्वाधिक बळी घेणारे खेळाडू –
लसिथ मलिंगा – मुंबई इंडियन्स (170 बळी)
सुनील नरेन – केकेआर (166 बळी)
जसप्रीत बुमराह – मुंबई इंडियन्स (150 बळी)
आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणारे भारतीय वेगवान गोलंदाज –
भुवनेश्वर कुमार – 170 बळी
जसप्रीत बुमराह – 150 बळी
उमेश यादव – 140 बळी
मोहम्मद शमी – 127 बळी
आयपीएलमध्ये एका संघासाठी 150 बळी घेणारे भारतीय –
जसप्रीत बुमराह – मुंबई इंडियन्स (150 बळी)
अधिक वाचा –
– दिल्ली कॅपिटल्ससाठी आता प्लेऑफचा रस्ता कठीण, जाणून घ्या ऋषभ पंतच्या संघाच्या पराभवाची कारणं
– अक्षर पटेलचा अशक्यप्राय झेल! इशान किशनचा विश्वासच बसेना; पाहा VIDEO
– हार्दिक पांड्यानं अखेर विजयाची चव चाखली! दिल्लीचा 29 धावांनी पराभव