मुंबई इंडियन्सला आयपीएल 2023 हंगामातील आपला दुसरा सामना शनिवारी (8 एप्रिल) कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्ज सोबत खेळायचा आहे. हंगामातील पहिल्या सामन्यात मुंबईला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून पराभव मिळाला होता. अशात या दुसऱ्या सामन्यात मुंबईवर विजयासाठी दबाव असणार आहे. मात्र, या सामन्याआधी मुंबईच्या कॅम्पमधून एक निराशाजनक बातमी समोर येत आहे. संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज शनिवारी होणाऱ्या सामन्यातून माघार घेऊ शकतो.
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघात यावर्षी गोलंदाजांची कमी भासत आहे. सुदैवाने इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) आयपीएल 2023 (IPL 2023) सुरू होण्यापूर्वी फिट झाला आणि मुंबईच्या ताफ्यात सामील झाला. हंगामातील पहिल्या सामन्यात आर्चरने 4 षटके गोलंदाजी केली आणि 33 धावा दिल्या. दुसऱ्या सामन्यात तो मुंबईकडून खेळताना आपली पहिली विकेट घेईल, अशी आशा चाहत्यांना होती. पण त्याआधीच आर्चरच्या दुखापतीची माहिती समोर यात आहे.
माजी क्रिकेटपटू एस बद्रीनात याने आपल्या यूट्यूब चॅनलवर याविषयी माहिती दिली. शुक्रवारी सराव सत्रादरम्यान जोफ्रा आर्चरच्या कोपऱ्यावर चेंडू लागला. अशात शनिवारच्या सामन्यातून तो माघार घेण्याची शक्यता आहे. जर त्याने माघार घेतली, तर मुंबई इंडियन्ससाठी हा मोठा झटका असेल. कारण संघात आर्चरव्यतिरिक्त कोणत अनुभवी गोलंदाज सध्या नाहीये. मुंबईचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आधीच संपूर्ण हंगामातून बाहेर झाला आहे. बुमराहचा बदली खेळाडू मुंबईच्या कॅम्पमध्ये दाखल झाला असला, तरी त्याची जागा भरणे सध्या तरी अशक्यच दिसत आहे. संघाकडे फलंदाजांचे मुबलक पर्याय आहेत, पण गोलंदाजी विभाग मात्र कमजोर दिसत आहे. (Mumbai Indians’ Jofra Archer is said to have suffered an injury in the practice session)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हैदराबादचे पराभवाचे सत्र सुरूच, राहुलसेनेचा 5 विकेट्सने दणदणीत विजय; लखनऊ संघ गुणतालिकेतील टॉपर
हैदराबादचा नवीन कर्णधार पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद, स्वत:लाही बसेना विश्वास, पाहा व्हिडिओ