आयपीएल हंगाम १४ चे उर्वरित ३१ सामने आता (१९ सप्टेंबर) पासून सुरू होणार आहेत. त्यासाठी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जचे काही खेळाडू शुक्रवारी (१३ ऑगस्ट) दुपारी यूएईला रवाना झाले. मुंबई अबुधाबी येथे पोहचला आहे. ५ वेळा आयपीएल विजेतेपद जिंकलेल्या मुंबई इंडियन्स संघाचे खेळाडू ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत, ते एक आलीशान हॉटेल आहे.
मुंबईच्या खेळाडूंना सेंट रेजिस सादियत आयलँड रिसॉर्टमध्ये क्वारंटाईन कालावधी पूर्ण करायचा आहे. हे विदेशी रिसॉर्ट समुद्रकिनारी बांधलेले आहे आणि आतील रचना प्रचंड आलिशान आहेत. ते अबुधाबी आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अवघ्या २० मिनिटांच्या अंतरावर आहे.
जाणून घ्या एका दिवसाचे भाडे किती आहे
या आठ मजली हॉटेलमध्ये ३१२ खोल्या, ६४ सुइट्स आणि १४ मीटिंग रूम आहेत. तेथे दररोज राहण्याची किंमत २५००० रुपयांपेक्षा जास्त आहे. इतर रिसॉर्ट सुविधांमध्ये इरिडियम स्पा, लक्झरी इनडोअर लॅप पूल, द सेंट रेजिस ऍथलेटिक क्लब, मैदानी पूल, खाजगी अबुधाबी बीच, अनोखी बैठक आणि कार्यक्रमाची जागा, समुद्रकिनारी जेवणाचा समावेश आहे.
मुंबईचे सदस्य क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर कोणतेही प्रशिक्षण उपक्रम सुरू करण्यापूर्वी अनिवार्यपणे आरटी-पीसीआर चाचणी करुन घेतील. नंतर बायो-बबलमध्ये समाविष्ट होतील.
Destination ➡️ Abu Dhabi 🇦🇪
Status ➡️ Arrived ✅#OneFamily #MumbaiIndians #IPL2021 @MarriottBonvoy @StRegisSaadiyat pic.twitter.com/JtlIZEPtVc— Mumbai Indians (@mipaltan) August 13, 2021
सीएसके-मुंबई सामन्यासह आयपीएल पुन्हा सुरू होईल
इंडियन प्रीमियर लीगची १४ वा हंगाम मे महिन्याच्या सुरुवातीला २९ सामन्यांनतर स्थगित करण्यात आला होता. तेव्हा काही संघातील खेळाडू आणि प्रशिक्षकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने ताबडतोब लीग स्थगित केली होती. आता १९ सप्टेंबर पासून उर्वरित १४ व्या आयपीएल हंगामाला सुरुवात होतील. चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याने उर्वरित हंगाम पुन्हा सुरू होईल.
Checked-in @StRegisSaadiyat ✅
Home away from home for our #OneFamily 🏠💙#MumbaiIndians #IPL2021 @MarriottBonvoy pic.twitter.com/EEiWCQEckm
— Mumbai Indians (@mipaltan) August 13, 2021
या तारखेला अंतिम सामना खेळला जाईल
उर्वरित आयपीएल २०२१ च्या वेळापत्रकानुसार, दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये पहिल्या क्वालिफायर आणि अंतिम सामन्यासह उर्वरित ३१ सामन्यांपैकी १३ सामने होतील. तर शारजाहमध्ये एलिमिनेटर आणि द्वितीय क्वालिफायरसह १० सामने असतील. उर्वरित सामने अबुधाबीमध्ये खेळले जातील.
स्पर्धेतील साखळी फेरी ८ ऑक्टोबर पर्यंत चालेल. १० ऑक्टोबरपासून प्लेऑफच्या सामन्यांना सुरुवात होईल. १५ ऑक्टोबर रोजी अंतिम सामना होईल. आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यानंतर दिल्ली कॅपिटल्स आठ सामन्यांनंतर १२ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी सात सामन्यांत १० गुण मिळवले आहेत. मुंबई इंडियन्स सात सामन्यांतील आठ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
टी-२० विश्वचषकासाठी आयसीसीची नवी घोषणा; संघात आता ‘एवढ्याच’ सदस्यांचा होणार समावेश
इंग्लंडच्या दिग्गज फिरकीपटूंना भारताविरुद्ध जे जमलं नाही ते मोईन अलीने करुन दाखवले
“नीरज चोप्राचे पदक सर्व दक्षिण आशियाई लोकांचे आहे”, माजी श्रीलंकन गोलंदाजाचे भाष्य