आता आयपीएल २०२१ सुरू होण्यास एका महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. मुंबई इंडियन्ससह अनेक संघ आयपीएलच्या तयारीसाठी यूएईला पोहोचले आहेत. त्यानंतर इतर संघ पुढील काही दिवसात यूएईला पोहोचतील. दरम्यान मुंबई इंडियन्स संघात समाविष्ट असलेला वेस्ट इंडिजचा खेळाडू किरोन पोलार्डने त्याच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पत्नीसोबतचा फोटो शेअर केला आहे. याक्षणी पोलार्ड बायो बबलमध्ये आहे. तो सीपीएल २०२१ मध्ये खेळत आहे आणि येथून तो आयपीएल २०२१ साठी यूएईला पोहोचेल. त्याच्यासोबत त्याची पत्नी देखील आहे.
पोलार्डने त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या पत्नीसाठी लिहिले की, “बबलमध्ये पुन्हा एकदा तो खास क्षण आला, पण सर्वात महत्त्वाचे आपल्याकडे काय आहे हे फोटो सांगत आहे. आम्ही एकमेकांच्या हातात हात घालून योग्य दिशेने वाटचाल करत आहोत. आमच्यावर असेच आशीर्वाद राहूदे. आय लव्ह यू.”
यासह पोलार्डने लिहिले की, “९ वर्षे पूर्ण झाली. आता ९१ बाकी आहेत.” किरोन पोलार्डने २५ ऑगस्ट २०१२ रोजी जेना अलीशी लग्न केले होते.
https://www.instagram.com/p/CTAJVX3nIq4/?utm_source=ig_web_button_share_sheet
कृणाल पांड्याची पत्नी पंखुडीने शुभेच्छा दिल्या
किरोन पोलार्डची पत्नी त्याच्यासोबत आयपीएल सामन्यांसाठी सोबत जात असते आणि मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंच्या पत्नींशी देखील तिची मैत्री आहे. मुंबईकडून खेळणाऱ्या कृणाल पांड्याची पत्नी पंखुडीही ही तिची चांगली मैत्रिण आहे. तिने पोलार्ड आणि त्याच्या पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहे. तिने दोघांना देखील मनापासून इमोजी देऊन शुभेच्छा दिल्या.
पहिल्या टप्प्यात आयपीएलचे एकूण २९ सामने झाले होते. ज्यात मुंबई इंडियन्सने ७ सामन्यांपैकी ३ सामने जिंकले होते. त्यामुळे ६ गुणांसह मुंबई इंडियन्स संघ गुणतालिकेत ४ थ्या स्थानावर आहे.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आलेल्या आयपीएलचा दुसरा टप्पा १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरू होत आहे. यात उर्वरित ३१ सामने खेळवले जाणार आहेत. यातील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘थाला’चे व्हॉलीबॉलमध्ये जादुई प्रदर्शन, पाहा कसे हवेत झेप घेत मारले दमदार स्मॅश
‘कोहली दिग्गज खेळाडू आहे, म्हणून तो पंचांच्या निर्णयांवर प्रश्न करू शकत नाही,’ माजी क्रिकेटर भडकला