भारतात सध्या कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. आतापर्यंत कित्येक मोठमोठ्या सिताऱ्यांनी या महामारीमुळे आपले प्राण गमावले आहेत. नुकतेच क्रिकेटविश्वातून एक दु:खद वृत्त पुढे आले आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या मुंबई इंडियन्स संघात नव्याने सहभागी झालेला अनुभवी गोलंदाज पियुष चावला याचे वडिल प्रमोद कुमार चावला आज (१० मे) कालवश झाले आहेत. त्यांना काही दिवसांपुर्वी कोरोनाची लागण झाली होती. चावलाने स्वत: सोशल मीडियाद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे.
चावलाने इस्टांग्राम पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, ‘माझे जिवलग वडिल प्रमोद कुमार चावला यांचे १० मे २०२१ रोजी निधन झाले आहे. ते गेल्या काही दिवसांपासून कोरोना आणि कोरोना महामारीनंतरच्या समस्यांचा सामना करत होते. या काळात तुम्हा सर्वांच्या प्रार्थना आमच्या कुटुंबासोबत असतील अशी अपेक्षा करतो. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.’
https://www.instagram.com/p/COrb35zlwud/?igshid=94jyww4zq89g
याबरोबरच मुंबई इंडियन्स संघाने यासंबंधी माहिती देत चावलाला धीर दिला आहे.
Our thoughts go out to Piyush Chawla who lost his father, Mr. Pramod Kumar Chawla this morning.
We are with you and your family in this difficult time. Stay strong. pic.twitter.com/81BJBfkzyv
— Mumbai Indians (@mipaltan) May 10, 2021
दुर्दैवाची बाब म्हणजे, रविवारी (०९ मे) राजस्थान रॉयल्स संघाचा युवा गोलंदाज चेतन सकारिया याच्याही वडिलांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. काही दिवसांपुर्वी सकारियाचे वडील कांजीभाई सकारिया यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे गुजरातमधील भावनगर येथील खाजगी रुग्णालात त्यांच्यावर उपचार चालू होते. अखेर रविवारी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
महत्वाच्या बातम्या-
राजस्थान रॉयल्सच्या चेतन सकारियावर कोसळला दु:खाचा डोंगर, कोरोनामुळे जिवलग वडिलांचे निधन
‘त्याच्या’मुळेच सीएसके संघ यंदा आयपीएलमध्ये टिकून राहू शकला, पाहा दिग्गजाने कोणाची केली स्तुती
‘असे केले नसते तर आज बाबा आमच्यासोबत नसते,’ अश्विनने सांगितला डोळे पाणावणारा प्रसंग