मुंबई इंडियन्स संघाने त्यांचा आयपीएल २०२२मधील चौथा सामना शनिवारी (दि. ०९ एप्रिल) पुण्याच्या एमसीए स्टेडिअमवर खेळला. यावेळी त्यांचा विरोधी संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर होता. या सामन्यात मुंबईला बेंगलोर संघाकडून ७ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. हा त्यांचा सलग चौथा पराभव होता. विशेष म्हणजे, या सामन्यात बेंगलोरने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये १, तर मुंबईने २ बदल केले होते. यावेळी रोहित शर्माने जेव्हा संघाची घोषणा केली, तेव्हा त्याच्या निर्णयाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
मुंबईने मैदानात उतरवले २ परदेशी खेळाडू
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने पहिल्यांदाच आपल्या प्लेइंग इलेव्हन संघात दोन परदेशी खेळाडूंना मैदानावर उतरवले होते. यातील संघाबाहेर असलेल्या दोन खेळाडूंमध्ये टायमल मिल्स आणि डॅनियल सॅम्सचा समावेश होता. तसेच, संघात सामील असलेल्या दोन परदेशी खेळाडूंमध्ये कायरन पोलार्ड आणि डेवाल्ड ब्रेविसचा समावेश होता. सॅम्स कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात चांगलाच महागडा ठरला होता. त्याने एकाच षटकात तब्बल ३५ धावा दिल्या होत्या.
नाणेफेकीवेळी काय म्हणाला रोहित शर्मा?
कर्णधार रोहित शर्मा (Captain Rohit Sharma) नाणेफेकीवेळी म्हणाला होता की, “आम्हालाही आधी गोलंदाजीच करायची होती. खेळपट्टी पाहिली, तर असे वाटते की, सामना जसा पुढे जाईल खेळपट्टी तशी चांगली होईल. आम्ही स्पर्धेत जे काही केले आहे, त्यापेक्षा अधिक स्वत:ला आजमावण्याची आणि लागू करण्याची गरज आहे. सर्वच सामने मोठे आहेत. जेव्हा तुम्ही तुमचा पहिला सामना खेळता, तेव्हा तुम्ही काहीशी लय मिळवण्याचा प्रयत्न करता. आज रात्रीचा पहिला विजय चांगला असेल. सूर्यकुमार यादव गुणवत्तापूर्ण खेळाडू आहे, तो निश्चितच आमच्या फलंदाजी क्रमाला मजबूती मिळवून देतो. आम्हाला त्याच्याकडून आणि फलंदाजी फळीकडून अपेक्षा करतो. संघात २ बदल आहेत. टायमल मिल्सच्या जागी जयदेव उनाडकट, तर डॅनियल सॅम्सच्या जागी रमणदीप सिंगचा समावेश करण्यात आला आहे.”
गुणतालिकेत कुठे आहे मुंबई संघ?
आयपीएल २०२२च्या गुणतालिकेवर नजर टाकली, तर मुंबई संघ ४ सामन्यांतील सलग पराभवानंतर शून्य गुणांसह नवव्या स्थानावर आहे. तसेच, बेंगलोर संघ ४ सामन्यांतील ३ विजय आणि १ पराभवानंतर ६ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.
आयपीएल २०२२मधील १८व्या सामन्यासाठी कशी होती उभय संघांची प्लेइंग इलेव्हन?
मुंबई इंडयिन्स- रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (यष्टीरक्षक), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, रमनदीप सिंग, मुरुगन अश्विन, जयदेव उनादकट, जसप्रीत बुमराह, बेसिल थंपी
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर: फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), डेविड विली, वनिंदू हसरंगा, हर्षल पटेल, आकाश दीप, मोहम्मद सिराज
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये चौकार-षटकारांच्या ‘या’ विक्रमात विराटच ‘किंग’, आजपर्यंत कोणालाच न जमलेला विक्रम नावावर
आयपीएलच्या मध्यात हर्षल पटेलवर कोसळला दुःखाचा डोंगर; मायेचा आधार कायमचा हरपला
IPL 2022 | केव्हा आणि कुठे पाहाल राजस्थान वि. लखनऊ सामना, कशी असेल खेळपट्टी; जाणून घ्या सर्वकाही