दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दुबई येथे आज (मंगळवार, १० नोव्हेंबर) आयपीएल २०२०चा अंतिम सामना होणार आहे. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात ही लढत रंगणार आहे. तत्पुर्वी दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे सामन्याच्या पहिल्या डावात मुंबईला गोलंदाजी करावी लागणार आहे. अशात मुंबईची अंतिम सामन्यातील नाणेफेकीसंबंधी मागची आकडेवारी पाहता, सामन्याच निकाल दिल्लीच्या बाजूने लागण्याच्या जास्त शक्यता आहेत.
आयपीएल आणि चॅम्पियन्स लीगमध्ये मिळून तब्बल सात वेळा मुंबईने अंतिम सामना खेळला आहे. त्यातील ६ सामन्यात त्यांनी प्रथम फलंदाजी केली असून सर्वच्या सर्व सहा सामने जिंकले आहेत. तर आयपीएल २०१०मधील अंतिम सामन्यात त्यांना त्यांना दुसऱ्या डावात फलंदाजी करावी लागली. त्यामुळे विरुद्ध चेन्नई सुपर किंग्सने त्या सामन्यात बाजी मारली आणि मुंबईला पराभव झाला.
अशात आजच्या आयपीएल २०२०च्या अंतिम सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी निवडली आहे. त्यामुळे मुंबई संघ दिल्लीच्या आव्हानाचा पाठलाग करण्यात यशस्वी ठरेल का नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या-
‘दिल्ली कॅपिटल्स माझ्या नि:शुल्क सल्ल्याचा फायदा घेत आहे’, अंतिम सामन्याआधी सेहवागची प्रतिक्रिया
जर आयपीएलचा अंतिम सामना टाय झाला तर…
IPL FINAL: रोहित, धवन, पोलार्ड यांच्याकडे असेल कीर्तिमान स्थापन्याची संधी; पाहा काय आहे खास आकडेवारी