आयपीएल 2019ची स्पर्धा हळूहळू रंगत चालली आहे. पण या स्पर्धेच्या सुरुवातीलाच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज ऍडम मिलने दुखापतीमुळे या आयपीएल मोसमातून बाहेर पडला आहे.
त्यामुळे आता मुंबई इंडियन्सने मिलनेचा बदली खेळाडू म्हणून विंडिजच्या अल्जारी जोसेफला करारबद्ध केले आहे.
याबद्दल प्रसिद्धिपत्रकात मुंबई इंडियन्सने माहिती देताना म्हटले आहे की ‘मुंबई इंडियन्सने आयपीएल 2019 साठी दुखापतग्रस्त ऍडम मिलने ऐवजी अल्जारी जोसेफची बदली खेळाडू म्हणून निवड केली आहे.’
मिलनेला मागीलवर्षीच्या आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सने 75 लाख रुपयांची बोली लावत संघात घेतले होते. मात्र तो एकही सामना खेळला नव्हता. तसेच मिलनेने याआधी आयपीएलमध्ये एकूण 5 सामने खेळले होते. यात त्याने 4 विकेट्स घेतल्या होत्या.
त्याच्या ऐवजी मुंबई संघात संधी देण्य़ात आलेला जोसेफ हा विंडिजकडून 9 कसोटी आणि 15 वनडे सामने खेळला आहे. तसेच यावर्षी तो पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळेल.
मुंबई इंडियन्सचा या आयपीएल मोसमातील दुसरा सामना आज(28 मार्च) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघ या मोसमातील पहिला विजय मिळवण्यासाठी उत्सुक असतील. या दोन्ही संघांना त्यांच्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.
महत्त्वाच्या बातम्या –
–आयपीएल २०१९: आज पंजाबकडून पदार्पण केलेला कोण आहे वरुण चक्रवर्ती…





