---Advertisement---

फुटबॉलपटू राहुल चाहर आणि ज्योतिषी सौरभ तिवारी, मुंबई इंडियन्सने शेअर केला मजेशीर व्हिडिओ

On: बुधवार, मे 19, 2021 12:04 AM
---Advertisement---

जगातील सर्वात प्रसिद्ध टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा १४ वा हंगाम (आयपीएल) कोविड-१९ च्या भारतातील दुसऱ्या लाटेमुळे स्थगित केला गेला आहे. एकापाठोपाठ एक अनेक खेळाडू व कर्मचारी कोरोना संक्रमित आढळल्याने २९ सामन्यानंतर हा हंगाम तात्पुरता रद्द केला गेला. ४ मे रोजी स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित केली गेल्याची घोषणा करण्यात आली. यानंतर सर्व फ्रेंचाइजी आपल्या खेळाडूंच्या आठवणी सोशल मीडियावर जुने व्हिडिओ टाकून जागवत आहेत. पाच वेळा आयपीएल विजेत्या ठरलेल्या मुंबई इंडियन्सने देखील असाच एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे.

फुटबॉलपटू राहुल चाहर
मुंबई इंडियन्स सध्या आपल्या खेळाडूंच्या आठवणी म्हणून सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत आहे. मुंबई इंडियन्सने ट्विटरवर नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये युवा फिरकीपटू राहुल चाहर आपले फुटबॉल कौशल्य दाखवतोय.

राहुल किती वेळा आपल्या पायावर चेंडू खेळवेल असा प्रश्न विचारला गेला असताना, मुंबईचा अनुभवी फलंदाज सौरभ तिवारी याने ‘२० वेळा’ असे उत्तर दिले. परंतु राहुल केवळ १५ वेळाच चेंडू पायाने हवेत उडवू शकला. त्याआधीच सौरभ तिवारीने ‘हात पहिली चूक करणार’ असा देखील अंदाज वर्तविला होता जो खरा ठरला. मुंबई इंडियन्सने या व्हिडिओला ‘सौरभ तिवारी भविष्यवेत्ता’ असे कॅप्शन लिहिले आहे.

राहुलने गाजवला आयपीएल २०२१ चा हंगाम
मागील चार वर्षापासून मुंबई इंडियन्स संघाचा भाग असलेल्या राहुल चाहरने आयपीएल २०२१ चा हंगामा चांगलाच गाजवला आहे. त्याने ७ सामन्यात ७.२१ च्या इकॉनॉमी रेटने ११ बळी आपल्या नावे केले आहेत. केकेआर विरुद्ध २७ धावा देऊन चार बळी त्याने आपल्या नावे करत संघाला विजय मिळवून दिला होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

वेस्ट इंडीजने केली टी२० विश्वचषकाची तयारी सुरू; तब्बल १५ सामन्यांसाठी संघ जाहीर, दिग्गजांनी केले पुनरागमन

धोनीचा मोठा फॅन आहे ‘हा’ इंग्लंडचा खेळाडू; म्हणतोय, ‘मला २०११ विश्वचषकातील विजयी षटकार आवडतो’

मागील वर्षी अंतिम ११ मधून वगळण्यात आल्याबद्दल पुन्हा एकदा ब्रॉडने केले मोठे भाष्य; म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---