आजवर आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक ४ वेळा विजेता ठरलेला संघ म्हणजे, मुंबई इंडियन्स. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबरदरम्यान खेळल्या जाणाऱ्या आयपीएलच्या तेराव्या हंगामातही मुंबईला विजयाचा प्रबळ दावेदार समजले जात आहे. त्यासाठी या संघाने युएईमध्ये सरावास सुरुवात केली आहे.
रोहित शर्मा कर्णधार असलेल्या मुंबई संघाने सरावादरम्यानचे त्यांचे काही फोटो ट्विटर अकाउंटवरुन शेअर केले आहेत. सोबतच त्यांनी एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे. या व्हिडिओत कर्णधार रोहित आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह त्यांच्या हातांनी एक खेळ खेळताना दिसत आहेत. या खेळाला ‘रॉक पेपर सिझर्स’ असे म्हणतात. Mumbai Indians Shared Video Of Rohit Sharma And Jasprit Bumrah
मुंबई इंडियन्सने हा व्हिडिओ शेअर करत, “पलटणच्या मागणीवर, रोहित विरुद्ध बुमराह. कोण जिंकेल ही स्पर्धा?, असे लिहिले आहे.” या खेळात शेवटी बुमराह विजेता ठरला आहे.
On Paltan's demand, #RohitvsBumrah is happening, who will win the battle? ⚔️
Watch to find out! 📹#OneFamily #MumbaiIndians #MI #Dream11IPL @ImRo45 @Jaspritbumrah93 pic.twitter.com/r1aGixDcvZ
— Mumbai Indians (@mipaltan) September 6, 2020
मुंबई इंडियन्स संघाच्या फलंदाजी फळीविषयी बोलायचे झाले तर, त्यांच्याकडे रोहितबरोबर सूर्यकुमार यादव आणि इशान किशन हे शानदार भारतीय फलंदाज आहेत. तर, क्रिस लिन आणि क्विंटन डी कॉक हे परदेशी फलंदाज उपलब्ध आहेत, ज्यांच्याकडे एकट्याच्या बळावर संघाला सामना जिंकून देण्याची क्षमता आहे.
या फलंदाजांबरोबर संघाकडे कायरन पोलार्ड, हार्दिक पंड्या आणि क्रुणाल पंड्या हे एकापेक्षा एक खतरनाक अष्टपैलू खेळाडू उपलब्ध आहेत. तर, टी२० स्पेशलिस्ट गोलंदाज जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट आणि नाथन कूल्टर नाइल असे अनुभवी गोलंदाज उपलब्ध आहेत. सोबतच राहुल चाहसारखा दमदार युवा गोलंदाजही संघाकडे आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
काय एक एक संघाचे नशीब असते,अन् काय या २ आयपीएल संघाचे नशीब आहे!
पुन्हा खळबळ! चेन्नई पाठोपाठ आता या आयपीएल संघाच्या सदस्याला कोरोनाची बाधा
ट्रेंडिंग लेख –
भारतीय संघाकडून वनडेत खेळलेले ४ खेळाडू, जे फारसे कुणाला माहीत नाही
टीम इंडियात हक्काची जागा न मिळालेला विदर्भाचा धडाकेबाज ढाण्या वाघ
आरसीबीला पहिल्यांदा आयपीएल विजेता बनवण्यात महत्वाची भूमिका बजावू शकतात हे ३ परदेशी खेळाडू