---Advertisement---

मुंबईकर सूर्यकुमारच्या विस्फोटक फलंदाजीमागचं कारण काय? जाणून घ्या त्याचं ‘टॉप सिक्रेट’

On: मंगळवार, एप्रिल 13, 2021 8:33 AM
---Advertisement---

आयपीएल २०२१ चा हंगाम ९ एप्रिल रोजी सुरु झाला. पहिल्या दिवशी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि मुंबई इंडियन्स संघात सामना झाला. यावेळी बंगळूरु संघाने मुंबई संघाला २ विकेट्सने पराजित केले. कर्णधार रोहित शर्मा असलेल्या मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत ५ वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. मुंबई संघाकडून सूर्यकुमार यादव याने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे.

मंगळवारी (१३ एप्रिल) मुंबई इंडियन्स संघ आयपीएल २०२१ मधील आपला दुसरा सामना कोलकत्ता नाईट रायडर्स संघासोबत खेळणार आहे. कोलकत्ता संघाच्या विरोधातील मॅच खेळण्याच्या आधी मुंबई संघाने सूर्यकुमार यादवचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. सूर्यकुमार यादव एक चांगला फलंदाज असून तो कशा प्रकारे तयारी करत आहे, हेच आपल्याला त्या व्हिडिओत दिसून येत आहे.

सूर्यकुमार मॅचच्या आधी जास्त विचार करत नाही व तो आपली रोजची दैनंदिनी पाळतो. जर खेळताना आपण आपण सकारात्मक असू तर आपल्याला कोणत्याही गोष्टीचा फरक पडत नसल्याचे त्याने म्हटले आहे. सूर्यकुमार यादवने बंगळूर संघाच्या विरोधात झालेल्या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे कोलकत्ता संघाच्या विरोधात त्याच्याकडून चांगल्या फलंदाजीची अपेक्षा असेल.

सूर्यकुमार यादवने या हंगामातील पहिल्या सामन्यात 23 चेंडूंत 31 धावा केल्या होत्या. मागील हंगामात त्याने 15 डावात 40 च्या सरासरीने आणि 145 च्या स्ट्राइक रेटने 480 धावा केल्या आणि मुंबई इंडियन्सला चॅम्पियन बनविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 2019 च्या आयपीएलमध्ये त्याने 15 डावांमध्ये 424 धावा केल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या-

SRH च्या गोटात झोंबले ‘वाथी कमिंग’चे वारे; पाहा वॉर्नर, भुवी अन् राशिदचा झक्कास डान्स

“माझ्याकडे बोलण्यासाठी शब्दच नाहीत,” पंजाबविरुद्ध झालेल्या पराभवानंतर संजू सॅमसन झाला भावूक

बरोबर ६ वर्षांनी हुडाने केली तशीच अर्धशतकी खेळी, फरक फक्त एवढाच तेव्हा राजस्थानसाठी तर आता राजस्थानविरुद्ध

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---