संयुक्त अरब अमिरातीमध्ये सध्या इंडियन प्रीमियर लीग २०२१ च्या उर्वरित सामन्यांचा थरार सुरू आहे. आतापर्यंत या टप्प्यातील ८ आणि संपूर्ण हंगामातील ३७ सामने पार पडले आहेत. अशात मुंबई इंडियन्स संघासाठी एक दु:खद बातमी पुढे आली आहे. मुंबई संघाच्या सपोर्ट स्टाफचा सदस्य आणि प्रतिभा शोधक (टॅलेंट स्काउट) पार्थिव पटेल याच्या वडिलांचे रविवारी (२६ सप्टेंबर) निधन झाले आहे. स्वत: पार्थिवने या दु:खद वृत्ताची माहिती दिली आहे.
आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटद्वारे ट्वीट करत त्याने ही शोकवार्ता दिली आहे. आपल्या वडिलांचा फोटो पोस्ट करत त्याने लिहिले आहे की, ‘मला सर्वांना कळवण्यात अतिशय दुख होते आहे की, माझे वडिल अजयभाई बिपिनचंद्र पटेल हे आज आपल्यात नाहीत. ते २६ सप्टेंबर २०२१ रोजी स्वर्गवासी झाले आहेत. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.’
It is with the deepest grief and sadness, we inform the passing away of my father Mr. Ajaybhai Bipinchandra patel. He left for his heavenly abode on 26th September 2021.We request you to keep him in your thoughts and prayers. May his soul rest in peace🙏 ॐ नम: शिवाय🙏🙏 pic.twitter.com/tAsivVBJIt
— parthiv patel (@parthiv9) September 26, 2021
पार्थिवच्या या ट्वीटनंतर क्रिकेटविश्वातून त्याच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. प्रज्ञान ओझापासून ते आरपी सिंग अशा बऱ्याच संघसहकाऱ्यांनी त्याच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Our deepest condolences to you and family! Stay strong brother. Om Shanti 🙏🏼
— Pragyan Ojha (@pragyanojha) September 26, 2021
Om shanti 🙏
— R P Singh रुद्र प्रताप सिंह (@rpsingh) September 26, 2021
माजी भारतीय क्रिकेटपटू पार्थिव सध्या मुंबई संघासोबत युएईत आहे. त्याला गतवर्षी डिसेंबरमध्ये मुंबईने संघाचा प्रतिभा शोधक म्हणून नियुक्त केले होते. तो मुंबई संघासाठी युवा प्रतिभाशाली खेळाडूंची शोध घेतो आणि त्यांना तयार करण्याचे काम करतो.
त्याने ऑगस्ट २००२ ला इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतीय यष्टीरक्षक फलंदाज अजय रात्रा यांना दुखापत झाल्याने पार्थिवला संधी मिळाली होती. पदार्पणाच्या वेळी तो १७ वर्षे १५२ दिवसांचा असल्याने कसोटी इतिहासातील युवा यष्टीरक्षक ठरला होता. त्याच्यापुर्वी १७ वर्षे ३०० दिवसांच्या वयात कसोटीत पदार्पण करणाऱ्या पाकिस्तानी यष्टीरक्षक हानिफ मोहम्मदचा विक्रम त्याने मोडला होता.
या यष्टीरक्षक फलंदाजाने भारताकडून २५ कसोटी, ३८ वनडे आणि टी२० सामने खेळले आहेत. तसेच त्याने ५ संघाकडून आयपीएल खेळले होते. यात चेन्नई सुपर किंग्स, डेक्कन चार्जर्स, सनराइजर्स हैद्राबाद, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्सचा समावेश होता.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषक: भारताची निवड चुकली? प्रमुख खेळाडू युएईत सपशेल फ्लॉप, मात्र राखीव खेळाडूंचा गाजावाजा
प्लेऑफमधून सर्वात आधी बाहेर होणाऱ्या SRHच्या खात्यात कोणालाही नको असलेला ‘लाजिरवाणा’ विक्रम
फक्त क्रिकेटर नव्हे तर धोनी माणूस म्हणूनही खूप मोठा, सर्वांपुढे स्टाफ मेंबरला ठोकला ‘सॅल्यूट’