मुंबई इंडियन्स संघ आयपीएल 2027 (IPL 2027) च्या तयारीसाठी काही मोठे बदल करण्याच्या विचारात आहे. यामुळे स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्याला (Hardik pandya) संघातून काढले जाऊ शकते, अशी चर्चा आहे. मात्र, मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) त्याला थेट रिलीज न करता ‘ट्रेड’ (खेळाडूंची अदलाबदल) करण्याच्या पर्यायावर विचार करत आहे. सध्या हार्दिक पांड्याला घेण्यासाठी 5 फ्रेंचायझी रस दाखवत आहेत.
चेन्नई सुपर किंग्स: चेन्नईला एका चांगल्या ‘मॅच फिनिशर’ची गरज आहे, त्यामुळे ते हार्दिकसाठी प्रयत्न करू शकतात. त्याबदल्यात मुंबई इंडियन्स त्यांच्याकडून शिवम दुबे आणि मुकेश चौधरी यांची मागणी केली जाऊ शकते.
कोलकाता नाईट रायडर्स: केकेआरला (KKR) सध्या एका नवीन कर्णधाराच्या शोधात आहे. अशा परिस्थितीत, हार्दिक पांड्याला ट्रेड करून ते आपल्या संघाचे नेतृत्व सोपवू शकतात. मुंबई इंडियन्स या बदल्यात केकेआरकडून रिंकू सिंग आणि वैभव अरोरा यांना मागू शकते.
दिल्ली कॅपिटल्स: पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पाहणारा दिल्लीचा संघ हार्दिकला आपल्या संघात घेण्यासाठी उत्सुक असू शकतो. मुंबई इंडियन्स या बदल्यात दिल्लीकडून आशुतोष शर्मा आणि कुलदीप यादव यांची मागणी करू शकते.
पंजाब किंग्स: पंजाब किंग्स देखील आपल्या पहिल्या आयपीएल ट्रॉफीच्या प्रतीक्षेत आहे. ते हार्दिकला संघात घेण्यासाठी पुढाकार घेऊ शकतात. मुंबई इंडियन्स या बदल्यात त्यांच्याकडून अर्शदीप सिंग आणि शशांक सिंग यांची मागणी करू शकते.
लखनऊ सुपर जायंट्स: लखनऊलाही एका नवीन कर्णधाराची गरज आहे. त्यामुळे ते देखील हार्दिक पांड्याला ट्रेड करण्याचा प्रयत्न करू शकतात. या बदल्यात लखनऊ संघ त्यांना मोहसिन खान आणि निकोलस पूरन ऑफर करू शकतो.





